वाळू वाहतूक रस्त्यांच्या मुळावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

जळगाव - नदीतून वाळूचा बेकायदा उपसा तर होतच आहे. परंतु शहरातून होत असलेली ही वाळू वाहतूक रस्त्यांच्या मुळावर उठलेली आहे. या वाहतुकीविरोधात शनिपेठ व बळिरामपेठ भागातील नागरिकांनीही वाळू वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

जळगाव - नदीतून वाळूचा बेकायदा उपसा तर होतच आहे. परंतु शहरातून होत असलेली ही वाळू वाहतूक रस्त्यांच्या मुळावर उठलेली आहे. या वाहतुकीविरोधात शनिपेठ व बळिरामपेठ भागातील नागरिकांनीही वाळू वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

नदीतून वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा करण्यात येत आहे. तो मोठमोठ्या डंपरमधून वाहतूक करून त्याची साठवण करण्यात येत आहे. दररोज शेकडो डंपर दिवसरात्र शहरातून धडधड करीत जात आहेत. हजारो टन वजनाच्या या डंपरमुळे शहरातील रस्त्याची अशरक्ष: वाट लागली आहे. त्याबाबत महापालिका, पोलिस प्रशासन सर्वच मूग गिळून गप्प आहेत. विशेष म्हणजे याच वाळूच्या वाहनांमुळे अपघातही झाले आहेत. मात्र ही वाहतूक थांबविण्यास कोणीही धजावत नाहीत. 

नागरिकांनीच घेतला पुढाकार 
शहरातील रस्त्यांची चाळण करणाऱ्या या वाळू वाहतुकीला चाप लावण्यासाठी आता शहरातील विविध भागातील नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर भागात रास्ता रोको करण्यात आला होता. तर शिवाजीनगरच्या चौकातही नागरिकांनी रात्री रस्त्यात खाटा टाकून ही वाहतूक बंद केली होती. 

शनिपेठ, बळिरामपेठेतही इशारा 
शनिपेठ, बळिरामपेठेतूनही मोठ्या प्रमाणात वाळू होत आहे. नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. नगरसेवक सुनील माळी यांनी याबाबत इशारा दिला आहे. शिवाजीनगर पुलावरून डंपराना मज्जाव असल्याने आठवडे बाजार, सिंधी कॉलनी, एमआयडीसी, मेहरूण परिसरात जाण्यासाठी डंपरधारक शनिपेठ, बळिरामपेठ रस्त्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची अत्यंत चाळण झाली आहे. त्या रस्त्यावरून अक्षरश: धूळ उडत आहे. हे रस्ते अधिक खराब झाल्यास त्यावरून वाहतूक करणेही कठीण होणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील वाळू वाहतूक ताबडतोब बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Web Title: marathi news jalgaon sand transport