त्या' 49 शाळांवर अद्याप कारवाई नाही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जळगाव ः शाळा पटपडताळणी मोहिमेत बोगस विद्यार्थी दाखविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यात जिल्ह्यातील 49 शाळांमध्ये बोगस विद्यार्थी आढळून आल्याचे 2011 मध्ये झालेल्या मोहिमेत आढळून आले आहे. या शाळांवर कारवाईसंदर्भात शिक्षण संचालकांनी काढलेल्या आदेशाला महिना होण्यात आल्यानंतर देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. 

शाळांमधील पटपडताळणी करण्यासाठी शासनाच्यावतीने 3 ते 5 ऑक्‍टोबर 2011 मध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यात 49 शाळा आढळून आल्या होत्या. या शाळांच्या तत्कालीन मुख्याध्यापकांसह, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी 27 जुलैला 2018 ला काढले. विशेष म्हणजे फौजदारी कारवाई तत्काळ करून याबाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश देखील शिक्षण संचालकांनी दिले आहे. आज सदर आदेशाला महिना होण्यावर आला असताना शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या कारवाईचा बडगा अद्याप उचलण्यात आलेला नाही. 

कोट्यवधीचे अनुदान लाटले 
बोगस पटसंख्या दाखवून शासनाकडून मिळणारे सर्व प्रकारचे अनुदान लाटण्याचा प्रकार देखील झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, पोषण आहार, पाठ्यपुस्तक यासह वेगवेगळे अनुदान मिळत असते. म्हणजे बोगस पटसंख्या दाखवून विद्यार्थ्यांना शाळांनी अनुदान लाटण्याचे काम केले आहे. असे असताना देखील शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

Web Title: marathi news jalgaon school froad student