सेल्फी काढून विवाहितेचे एक लाखासाठी ब्लॅकमेलिंग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

जळगाव ः चुंबन घेतानाचे सेल्फी काढून ते छायाचित्र पतीला तसेच भावाला दाखविण्याची धमकी देत विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. पीडिताच्या तक्रारीवरून गेल्या गुरुवारी (20 जून) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दाखल गुन्ह्यातील संशयित राहुल वामन आघाव (रा. वीरसावकरकरनगर, नंदुरबार) यास नंदुरबार कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरुद्ध तेथेही एका पीडिताने तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार पंचवीसवर्षीय विवाहितेचे पती सुरत येथे नोकरीनिमित्त कार्यरत असून, तिचे मुलांसह सुरत येथे येणे-जाणे असते. सुरत येथे जाताना सौंदर्यप्रसाधने विक्रेता प्रतिनिधी असल्याचे सांगत राहुल आघाव याने ओळखी वाढविली. मोबाईल नंबरची देवाणघेवाण होऊन चॅटिंगच्या माध्यमातून राहुल पीडिताच्या संपर्कात होता. त्यानंतर त्याने एकदा शहरातील खानदेश सेट्रलमध्ये भेटण्यास बोलावून तिचे चुंबन घेतानाचे सेल्फी काढले. यानंतर भुसावळ येथे हॉटेलात नेऊन अत्याचार केले. सतत हा प्रकार (ऑगस्ट 2018 ते 18 जून 2019) सुरूच होता. मात्र, आता राहुल आघाव याची हिंमत वाढून तो या पीडिताला एक लाख रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल करीत असल्याने पीडिताने पोलिसांत धाव घेतली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन शहर पोलिसांनी त्याला नंदुरबार येथून ताब्यात घेऊन अटक केली. 

नंदुरबार कारागृहातून ताब्यात 
अत्याचार प्रकरणातील संशयित राहुल आघाव याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत कारागृहात होता. शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश मोरे यांनी संशयित राहुल आघावला कारागृहातून 28 जूनला ताब्यात घेत आज न्या. सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. सुप्रिया क्षीरसागर यांनी काम पाहिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon selfy woman blackmailing