
सेवालयाचा वर्धापन दिन उद्या (ता.21) साजरा होत आहे. जिल्हा रुग्णालय आवारात सेवालय सुरू करताना रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजूंना जेवण देण्यापासून कार्याला सुरवात केली.
जळगाव : समाजात अनेकांना आजही एक वेळचे जेवण मिळणे कठीण आहे. यामुळे भुकेले झोपण्याची वेळ अनेकांवर येते. परंतु अशा भुकेलेल्यांची भूक भागविण्यासाठी अनेक हात सरसावत असतात. यातील एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे सेवालय. या सेवालयाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत अडीच लाखांहून अधिक गरजवंतांना भोजन देण्याचे कार्य केले आहे.
आर्वजून पहा : दुर्दवी दुर्घटना...! सुटले नियंत्रण अन् कोसळे पन्नास फुट खोल दरीत
जनकल्याण समितीमार्फत जिल्हा रुग्णालय आवारात सेवालय चालविण्यात येत आहे. या सेवालयाच्या कार्याची सुरवात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात आली. यास पाच वर्षाचा काळ पूर्ण होत आहे. सेवालयाचा वर्धापन दिन उद्या (ता.21) साजरा होत आहे. जिल्हा रुग्णालय आवारात सेवालय सुरू करताना रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजूंना जेवण देण्यापासून कार्याला सुरवात केली. तर बोदवड तालुक्यातील चिलखेडसिम, एरंडोलमधील पिंप्री आणि पारोळा तालुक्यातील नांद्रा या तीन गावांमध्ये पाझरतलावाचे काम करण्यात आले.
नक्की वाचा : सातपुड्यातील सिकलसेल वर ठोस उपाययोजनांची गरज
रोज शंभर जणांना जेवणाचे पार्सल
जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून तसेच गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. यात निवडक गरजू शंभर रुग्णांना रोज सकाळी जेवणाचे पार्सल वाटप करण्यात येत असते. महिनाभरात साधारण साडेपाच हजार जेवणाचे पार्सल वाटप करण्यात येत असतात. तर सायंकाळी 50 प्रसूती झालेल्या महिलांना साजूक तुपातील खिचडी देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच चार महिन्यांपासून सायंकाळी खिचडी वाटप करण्यात येत आहे.
नक्की वाचा : राज्यपाल म्हणाले...टेस्ट बहुत मिठा है
गावांमध्ये आरोग्य रक्षक
ग्रामीण भागापर्यंत आपली सेवा पोहचविताना सेवालयमार्फत आरोग्य रक्षक नेमण्यात आले आहेत. सध्या स्थितीला तीस गावांमध्ये हे आरोग्य रक्षक गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहेत. या आरोग्य रक्षकांकडून रुग्णांना प्रथमोपचार म्हणून गोळ्या- औषधींचे वाटप करण्यात येत असते.
भविष्यात येणार फिरता दवाखाना
"सेवालय'च्या नावाप्रमाणे गरजूंसाठी सेवा सुरू आहेत. त्यानुसार भविष्यात शहरातील दलित वस्तीकरीता फिरता दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्याचे नियोजन देखील सुरू आहे. सोबतच फिरते विज्ञान प्रयोगशाळा देखील सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सेवालयाचे नंदू शुक्ल यांनी सांगितले.