पोषण आहारासंबंधी घेतला आढावा; समिती दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

जळगाव ः जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात असतो. या पोषण आहाराची शाळास्तरावर तपासणी करण्यासाठी केंद्रीय समिती जिल्ह्यात दाखल झाली. दहा जणांच्या समितीतील चार जण आज दुपारी जळगावात आल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाकडून पोषण आहार योजनेसंबंधीचा आढावा घेतला. 

जळगाव ः जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात असतो. या पोषण आहाराची शाळास्तरावर तपासणी करण्यासाठी केंद्रीय समिती जिल्ह्यात दाखल झाली. दहा जणांच्या समितीतील चार जण आज दुपारी जळगावात आल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाकडून पोषण आहार योजनेसंबंधीचा आढावा घेतला. 
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा तसेच खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन म्हणून पोषण आहार दिला जात असतो. जिल्ह्यात पोषण आहारासंबंधीत खुप तक्रारी आहे. या तक्रारी राज्य शासनापर्यंत पोहचल्या आहेत. परंतू, पोषण आहारासह 28 मुद्यांच्या तपासणीसाठी केंद्र शासनाची दहा सदस्यीय समिती आजपासून जिल्हा दौऱ्यावर आहे. समिती येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांतील गटशिक्षणाधिकारी व शाळांवर तयारी सुरू आहे. शिवाय आजही जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागाचे कार्यालय सुरू होते. दरम्यान, दुपारी साडेचारला समितीतील मुख्य सल्लागार भूपेंद्र कुमार, दिनेश प्रधान, डॉ. स्वाती ध्रुव दाखल झाले आहे. 

नंदिनीबाई शाळेत घेतला आढावा 
जळगावात समितीचे सदस्य दाखल झाल्यानंतर भुपेंद्र कुमार व दिनेश प्रधान यांनी पोषण आहारासंबंधी शिक्षण विभागाकडून आढावा घेतला. यात जिल्ह्यात एकूण किती शाळा आहेत, मुलांची पटसंख्या, त्यांना किती आहार दिला जातो. या मुद्यांसह विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कधी झाली; याविषयी माहिती घेवून आढावा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांच्यासह सर्व गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते. समितीतील मुख्य सल्लागार भुपेंद्र कुमार यांनी दिली. 

आज शाळांना भेट 
शालेय पोषण आहार समितीकडून पोषण आहाराच्या कामकाजाच्या नोंदी घेण्याच्या कामांसह प्रत्यक्ष पोषण आहार कसा आहे, धान्याची क्‍वॉलिटी यासह 28 मुद्यांची माहिती घेण्यासाठी समिती सदस्य उद्या (3 डिसेंबर) जिल्ह्यातील जि.प. शाळा, तसेच खासगी शाळा, हायस्कूलमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. दहा सदस्यीय समितीचे तीन पथके करून जिल्ह्यातील 25 शाळांमध्ये समिती सदस्य अचानक भेट देणार असल्याची माहिती समितीतील मुख्य सल्लागार भूपेंद्र कुमार यांनी दिली. 

राज्य शासनाला देणार अहवाल 
केंद्रीय समिती शाळांच्या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच येत्या चार दिवस समिती जिल्ह्यात राहणार आहे. यानंतर सातारा येथे जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेटी देऊन समिती 10 डिसेंबरला राज्य शासनाकडे अहवाल सादर करणार आहे. जिल्हा पोषण आहाराबाबत मॉडेल बनविणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon shaley poshan aahar samiti