शेतकरी समृद्ध करण्याची जबाबदारी समाजाची ः शरद पवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

जळगाव ः शेतीला योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटतील. एखाद्या उत्पादनाची भाववाढ झाली, कांदा महाग, गहू महाग झाला असे म्हणण्यापेक्षा शेतीला आणि शेतकऱ्याला समृद्ध करायला हवी. ही जबाबदारी तुमची- आमची आणि सर्व समाजाची आहे. असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्‍त केले. 

जैन इरिगेशनतर्फे (कै.) अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च व तंत्र पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जैन हिल्स येथे आयोजित सोहळ्यात सुरवातीला जैन फूडस्‌च्या मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. यानंतर अप्पासाहेब पवार कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात अविनाश मनोहर पाटोळे (वडनेर भैरव, ता. चांदवड) यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा- स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, की देशातील शेतकऱ्यांचा विचार आधी झाला पाहिजे. उत्पादीत करणाऱ्यांपेक्षा आपल्यापर्यंत घास पोहचविणाऱ्या उत्पादकाचा विचार प्राधान्याने व्हायला आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल. तसेच पंजाबमध्ये गव्हावर तांबेरा रोग पडत असून, तसाच रोग केळीवर येण्याची शक्‍यता असल्याने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. 

Web Title: marathi news jalgaon sharad pawar