शरद पवार यांची आज एरंडोल येथे जाहीर सभा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (ता. 5) सायंकाळी साडेसहाला एरंडोल येथे जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी दिली. 

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (ता. 5) सायंकाळी साडेसहाला एरंडोल येथे जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी दिली. 
शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समन्वयक विकास पवार, ललित बागूल, प्रवक्ता योगेश देसले आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना ऍड. पाटील यांनी सांगितले, की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे उद्या (ता. 5) दुपारी तीनला जैन हिल्स येथे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी एरंडोल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे जळगाव मतदार संघाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ रा. ति. काबरे विद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर रात्री जैन हिल्स येथे मुक्काम करणार आहेत. यावेळी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. 
 
Web Title: marathi news jalgaon sharad pawar sabha erndol today