आदित्य ठाकरे गुरुवारी खानदेशात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

जळगाव : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी (ता. 18) खानदेश दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त शिवसेनेची जिल्हा बैठक रविवारी (ता.14) आयोजित करण्यात आली आहे. 

जळगाव : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी (ता. 18) खानदेश दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त शिवसेनेची जिल्हा बैठक रविवारी (ता.14) आयोजित करण्यात आली आहे. 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी ते विमानाने जळगाव विमानतळावर येतील. त्यानंतर जिल्ह्यात धरणगाव, एरंडोल, चोपडा, पाचोरा येथे शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या सभेचे अधिकृत नियोजन अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील सभा आटोपल्यानंतर ते धुळ्याकडे रवाना होणार आहेत. राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनीही त्यांच्या खानदेश दौऱ्याला दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांच्या सभेचे अंतिम नियोजन लवकरच प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले. 

शिवसेनेची जिल्हा बैठक 
शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेनेची जिल्हा बैठक रविवार (ता. 14) ला आयोजित करण्यात आली आहे. केमिस्ट भवन येथे दुपारी बाराला ही बैठक होईल. या बैठकीला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत विलास पारकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेना विस्तारक कुणाल दराडे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, नगरसेवक युवा सेना पदाधिकारी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानगर प्रमुख शरद तायडे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shena aaditya thakarye jilha daira