शिक्षक मतदार संघासाठी 22 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

जळगाव ः विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आज दूपारी बारापर्यंत 22 टक्के मतदान शांततेत झाले. सकाळी सातपासून मतदानास जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले. दहापर्यंत मतदानाची धिमी गती होती. दहानंतर मतदारांची संख्या वाढली. जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयातील चार केंद्रावर सकाळी अकरापासून गर्दी होती. उमेदवारांची समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यत आणून देत असतानाचे चित्र होते. पोलिस बंदोबस्तात मतदानास आलेला मतदार तोच आहे किंवा नाही याची खात्री केली जात होती. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी किशोर राजे निंबाळकर मतदान प्रक्रियेवर नजर ठेवून होते. 

धुळे जिल्ह्यात 32 टक्‍के 
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत धुळे जिल्ह्यात बारा केंद्रावर मतदार प्रक्रिया सुरू आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत 32 टक्‍के मतदान झाले आहे. 

Web Title: marathi news jalgaon shikshak mardar sangh election