शिवाजीनगर पुलाचे काम आठ दिवसांत सुरू होणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

जळगाव ः शिवाजीनगर नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील कामाला आठ दिवसांत विकासकांकडून सुरवात होणार आहे; तर रेल्वे विभागाच्या हद्दीतील पिलर उभारणीचे रेल्वे प्रशासनाकडून काम सुरू केले आहे. 

जळगाव ः शिवाजीनगर नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील कामाला आठ दिवसांत विकासकांकडून सुरवात होणार आहे; तर रेल्वे विभागाच्या हद्दीतील पिलर उभारणीचे रेल्वे प्रशासनाकडून काम सुरू केले आहे. 
शहरातील ब्रिटीशकालीन पूल असलेल्या शिवाजीनगर पुलाचे नव्याने उभारणीचे काम रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. पूर्वीच्या डिझाईनमध्ये दोन ठिकाणी रस्त्याच्या चौकात पिलर येत असल्याने नवीन डिझाईन तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार की मक्तेदार या वादात तीन महिने वाया गेले. त्यानंतर नव्याने मक्तेदाराने डिझाईन तयार केले असून, पुलाच्या प्रत्यक्ष कामाला आठ दिवसांत सुरवात होणार आहे. 

पिलर उभारणीचे काम प्रगतिपथावर 
रेल्वेहद्दीतील पुलाच्या कामाला सुरवात झाली असून, रेल्वे प्रशासनाकडून पिलर उभारणीचे काम सुरू आहे. रेल्वे प्रशासाकडून पाया खोदून पिलर उभे करण्याचे काम गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू केले आहे. 

पावसामुळे काम लांबले 
जिल्ह्यासह जळगाव शहरात सतत पाऊस सुरू असल्याने पूल उभारणीच्या कामात व्यत्यय येत आहे. त्यामुळे काम सुरू करण्यास अडचण येत असल्याने आठ दिवसांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. 

वीजवाहिनी काढण्याचे काम संथ 
जिल्हा परिषदेकडील रस्त्याच्या मध्यभागाची वीजवाहिनी काढण्याचे काम "महावितरण'कडून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दुभाजक तोडण्याचे काम अतिशय हळूहळू करावे लागत असल्याने "महावितरण'ने लवकरच वीजखांब स्थलांतरीत केल्यास कामाला लवकर सुरवात करता येणार आहे. 

शिवाजीनगर पुलाचे काम सुरू करण्यास सतत पडणाऱ्या पावसामुळे समस्या निर्माण होत होती. पुलाची डिझाईन तयार झाली असून, आठ दिवसांत पुलाच्या कामाला सुरवात होईल. रेल्वे विभागाकडून त्यांच्या हद्दीतील 
पिलर उभारण्याचे काम सुरू केले आहे. 
- आदित्य खटोड, विकासक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivaji nagar brige 8 days work