शिवाजीनगरमधील लाकूडपेठेत भीषण आग 

live photo
live photo

जळगाव : शिवाजीनगर भागातील लाकूडपेठेत आज मध्यरात्री बाराच्या सुमारास सॉ-मिलमध्ये भीषण आग लागली. आगीत शेकडो टन लाकडासह फर्निचरही खाक झाले. ट्रकही आगीत लपेटला गेला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. 
शिवाजीनगर परिसरात शिव-विजय सॉ-मिल, अंबाजी सॉ-मिल व स्वस्तीक प्लायवूडला आज मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत शेकडो टन लाकूड खाक झाले. अमृत योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम शिवाजीनगर भागात सुरू असून, कानळदा रस्त्यावर बॅरिकेट्‌स लावण्यात आले आहेत. शिवाजीनगर उड्डाणपुलावरूनही बंब येऊ शकत नाही. यामुळे अग्निशमन विभागाचे बंब येण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आगीमुळे परिसरातील आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. ट्रकही आगीत लपेटला गेला. अग्निशमन विभागाच्या सहा बंबांनीही आग आटोक्‍यात आली नसून, आगीने रौद्र रूप धारण केले होते. परिसरातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील तरुणही आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे स्वस्तिक प्लायवूडचे मालक शांतिलाल पटेल, "अंबाजी'चे मालक मनसुखभाई पटेल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com