शिवाजीनगर पुलाचे काम पुन्हा लांबणीवर 

शिवाजीनगर पुलाचे काम पुन्हा लांबणीवर 

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला पाच फेब्रुवारीपासून सुरवात होणार असून, एक तारखेपासून वाहतूक बंद करण्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने महापालिकेला दिले होते. त्यानंतर शिवाजीनगर उड्डाणपूल पाडण्याचे काम जोपर्यंत पर्यायी मार्ग देत नाही, तोपर्यंत सुरू करू नये, असा ठराव महापालिकेने केला आहे. त्यानुसार लेंडीनाल्यावरील पुलाचे काम जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत पूल पाडू नये, असे पत्र महापालिका प्रशासनाने रेल्वे विभागाला दिले आहे. त्यामुळे पूल पाडण्याचे काम एप्रिलपर्यंत लांबणीवर जाणार आहे. 
शंभर वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक बंद करण्यात यावी, हा पूल कधीही पडू शकतो, असे पत्र रेल्वे प्रशासनाने महापालिकेला दिले होते. तरीही पर्यायी रस्ता नसल्याने या पुलावरून वाहतूक सुरूच होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुलाचे काम हाती घेत 5 फेब्रुवारीपासून पूल तोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिवाजीनगरवासियांना पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे जोपर्यंत पर्यायी रस्ता होत नाही, तोपर्यंत शिवाजीनगर पुलाचे काम सुरू करू नये, असा विरोध 
दर्शविला होता. तसेच महापालिकेच्या महासभेतही शिवाजीनगर परिसरातील नगरसेवकांनी हीच मागणी केल्यामुळे महासभेत लेंडीनाल्यावरील पुलाचे काम होईपर्यंत शिवाजीनगर पुलाचे काम सुरू करण्यात येऊ नये, असा ठराव केला होता. हा ठराव रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. 
 
आयुक्तांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा 
महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली व शिवाजीनगर वासियांच्या मागणी लक्षात घेता लेंडी नाल्यावरील पुलाचे काम होईपर्यंत कामाला सुरवात करू नये, अशी मागणी केली. परंतु रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेले लेंडी नाल्याचे काम हे एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असल्यामुळे रेल्वे उड्डाणपुलाचे काम एप्रिलपर्यंत लांबणीवर पडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com