शिवशाही'मध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

जळगाव, ता. 1 ः राज्य परिवहन महामंडळाची बस 70 वर्षांपूर्वी सेवेत सुरू झाली. एसटीचे रूप बदलल्यानंतर शिवशाही स्लिपर कोच बससेवा सुरू करण्यात आली असून, वर्धापन दिनानिमित्त शिवशाही बसमधून ज्येष्ठ नागरिकांना 30 टक्‍के सवलत सुरू करण्यात आली आहे. शिवाय, जळगाव विभागातून सेवानिवृत्त झालेल्या 93 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला सुरवात झाल्यानंतर हळूहळू एसटीचे रूप बदलत गेले. यातच परिवहन महामंडळाकडून खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेत शिवशाही बससेवा सुरू केली. इतकेच नाही तर प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्यासाठी एसी स्लिपर कोच बस सुरू झाली. प्रवासी भाड्याला न परवडणाऱ्या शिवशाही स्लिपर कोच बसमधून ज्येष्ठ नागरिकांना देखील सवलतीत प्रवास करता यावा, या अनुषंगाने वातानुकूलित आसनी बसमध्ये 45 टक्‍के व स्लिपर बसमध्ये 30 टक्‍के सवलत देण्याचा निर्णय महामंडळातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार या सवलतीच्या भाडेदराला आजपासून (1 जून) वर्धापनदिनी सुरवात करण्यात आली. 

केक कापून वर्धापन साजरा 
एसटीचा 70 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम जळगाव बसस्थानक आवारात सकाळी दहाला झाला. एसटी बसस्थानकाला पताके व रांगोळींनी सजवून प्रवाशांच्या हस्ते केक कापण्यात आला. प्रत्येक बसमध्ये चढून प्रवाशांना अभिवादन करण्यात आले. तसेच आवारातील प्रवाशांना साखर, पेढे व गुलाबपुष्प वाटप करून एसटीतून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, विभागीय वाहतूक अधीक्षक सुरेश महाजन, सांख्यिकी अधिकारी प्रशांत महाजन आदी उपस्थित होते. 

93 सेवानिवृत्तांचा सत्कार 
एसटीच्या जळगाव विभागातील 90 कर्मचारी व दोन अधिकारी 31 मेस सेवानिवृत्त झाले. या सर्व कर्मचाऱ्यांचा आज (1 जून) बसस्थानक आवारात झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान सपत्नीक सत्कार करण्यात आला. कर्मचाऱ्याला शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

Web Title: marathi news jalgaon shivshahi bus