जळगाव- पुणे "शिवशाही शयनयान'चा प्रवास आवाक्‍यात! 

जळगाव- पुणे "शिवशाही शयनयान'चा प्रवास आवाक्‍यात! 

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर होते. यामुळे गेल्या वर्षभरापासून महामंडळाला तोटा सहन करावा लागत होता. मात्र, आता "शिवशाही शयनयान'च्या भाड्यात कपात करण्यात आल्याने प्रवास आवाक्‍यात आला आहे. मुख्य म्हणजे जळगाव- पुणे असे "शयनयान'चे प्रवासभाडे पावणेतीनशे रुपयांनी कमी झाल्याने प्रवास करणे शक्‍य झाले आहे. 
महामंडळाच्या जळगाव विभागातून जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा व मुक्ताईनगर या आगारांमधून प्रत्येकी दोन, अशा आठ वातानुकूलित शिवशाही बस रोज धावत आहेत. "शिवशाही'चे भाडे खासगी बसपेक्षा अधिक असल्याने त्यास कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महामंडळाने "शिवशाही शयनयान' बसच्या तिकीटदरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला होता. त्यानुसार महामंडळाने "शिवशाही'च्या वातानुकूलित बसभाड्यात सुमारे 230 ते 505 रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 12 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आगारप्रमुखांना दिले आहेत. 

ज्येष्ठांसह सर्वसामान्यांना होणारा फायदा 
वातानुकूलित "शिवशाही शयनयान' बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीटदरात यापूर्वीच सवलत देण्यात आली आहे. त्यांना "शिवशाही'मधून कमी पैशांत प्रवास करता येत असल्याने त्यांना याचा फायदा होत आहे. मात्र, शासनाने "शिवशाही'च्या दरात कपात केल्याने सर्वसामान्य प्रवाशांनाही आता आरामदायी प्रवास करणे शक्‍य होणार आहे. खासगी ट्रॅव्हल्सला हा मोठा दणका असून, "शिवशाही'चे दर कमी झाल्याने याचा परिणाम खासगी ट्रॅव्हल्सवर निश्‍चित पडणारा आहे. 


बसफेरी सध्याचे भाडे कपातीनंतरचे दर 

जळगाव- पुणे शिवाजीनगर 1080 रुपये 805 रुपये 
जळगाव- मुंबई 1190 रुपये 890 रुपये 
जळगाव- नगर 760 रुपये 570 रुपये 
जळगाव- नाशिक 695 रुपये 520 रुपये 
जळगाव- औरंगाबाद 455 रुपये 345 रुपये 
चोपडा- पुणे 1140 रुपये 855 रुपये 
जळगाव- नागपूर 1205 रुपये 900 रुपये 
पाचोरा- पुणे 1110 रुपये 830 रुपये 
चाळीसगाव- पुणे 965 रुपये 725 रुपये 
जळगाव- अमरावती 805 रुपये 605 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com