गुलाबराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणेंना शिवसेनेतर्फे उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

जळगाव : जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार असलेल्या तीनही विधानसभा मतदारसंघांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील व चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लता सोनवणे यांना पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करून "एबी' फॉर्म देण्यात आला आहे, अशी माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली. 

शिवसेनेतर्फे मुंबईत आज राज्यातील विधानसभा उमेदवारांना ए. बी. फॉर्मचे वाटप करण्यात आले. याबाबत माहिती देताना जळगाव लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सांगितले, की पक्षातर्फे विद्यमान आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अधिकृत उमेदवार जाहीर करून एबी फॉर्मही देण्यात आले आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून पक्षाचे उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार किशोर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लता सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

एरंडोल, जळगावची लवकर घोषणा 
जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत सावंत म्हणाले, की सद्य:स्थितीत केवळ विद्यमान आमदार असलेल्यांना ए. बी. फॉर्म देण्यात आले आहेत. 

एरंडोल मतदारसंघातूनही लवकरच उमेदवारी जाहीर केली जाईल. जळगाव शहर मतदारसंघाबाबत शिवसेनेने मागणी केली आहे. या मतदारसंघात आमच्याकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. 
- संजय सावंत जिल्हा संपर्कप्रमुख जळगाव लोकसभा क्षेत्र 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivshena candidate diclare