स्मार्ट फोनद्वारे स्वयंचलित रोबोट निर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

जळगाव : केसीई तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्याने स्मार्ट फोनद्वारे स्वयंचलित रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट कोणत्याही जागेवर सहज चालू शकत असून यात विविध उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमधील ऍपद्वारे रोबोट सहज नियंत्रित करू शकता येणार आहे. 

केसीई सोसायटीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अणुविद्युत अभियांत्रिकीचा विद्यार्थी विनय बडगुजर याने हा प्रकल्प साकारला आहे. मायक्रोकंट्रोलर तंत्रज्ञानाने नियंत्रित या रोबोटमध्ये ह्यूमिनिटी सेन्सॉर, टेंपरेचर, सेन्सॉर, प्रोसिमिटी सेन्सॉरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या भु-भागाचा अचूक अंदाज घेत स्वतः:चा मार्ग निश्‍चित करून योग्य ती माहिती वापरकर्त्यापर्यंत पोचवतो. 
रोबोटमध्ये रोकर बोगी ही यंत्रणा वापरली आहे. या यंत्रणेमुळे रोबोट चिखलात, खडबडीत भागावर सहज चालू शकतो. या रोबोटला स्मार्टफोनने ऍपद्वारे सहज नियंत्रित करू शकता येते. तसेच सभोवतालची आद्रता, तापमान व वातावरणातील ऑक्‍सिजनचे प्रमाण मोजण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे. या प्रयोगासाठी विनयला प्राचार्य डॉ. के. पी. राणे, प्रा. संजय सुगंधी, तंत्रनिकेतनचे प्राचार्य गजानन पाखरे, विभागप्रमुख रोशन भामरे, भावना सोनवणे, प्राची भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
असे आहेत फायदे.... 
 मार्ग योग्य निश्‍चित करतो 
 कुठल्याही भागावर चालतो 
 ऍपद्वारे सहज नियंत्रित 
 दुर्गम भागात वावर शक्‍य 
 वातावरणाची योग्य माहिती 

Web Title: marathi news jalgaon smartphone rabot