सौभाग्य योजनेतुन होणार वडगांव प्रकाशमान! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

जळगाव ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत "महावितरण'तर्फे सौभाग्य योजनेतून रावेर तालुक्‍यातील वडगावचे 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ते 5 मे या कालावधीत राज्यात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियानांतर्गत शंभर टक्के विद्युतीकरणासाठी 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दलितवस्ती, गरीब कुटुंबांची संख्या असलेल्या राज्यातील 192 गावांची निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील वडगाव (ता. रावेर) या गावाचा समावेश आहे. 
 
70 कुटूंबांना मोफत वीज 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या "प्रधानमंत्री हर घर बिजली' योजना अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात शहरी व ग्रामिण भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. ग्रामस्वराज्य अभियान कालावधीत रावेर तालुक्‍यातील वडगाव या गावातील 70 कुटुंबाना मोफत वीज जोडणी देण्याचे नियोजन आहे. नवीन वीज जोडणीसाठी आवश्‍यक पायाभुत विद्युत यंत्रणा उभारणी करण्यात येणार आहे. परंतू, ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे अशा ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरल्यानंतरच सदर योजनेचा लाभ घेता येईल. 
 
गावात लावणार शिबीर 
केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेतून तात्काळ वीज जोडणीसाठी अभियानातंर्गत निवड झालेल्या वडगावात विशेष शिबिर भरविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी संपर्क साधावा आणि वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

Web Title: marathi news jalgaon soaubhagya yojna