सोशल मीडियाच्या प्रचारासाठी "वॉररूम' होताहेत सज्ज! 

live photo
live photo

जळगाव : विविध पक्षांतर्फे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. पारंपरिक प्रचारासोबत डिजिटल प्रचारासाठीही आता उमेदवार सज्ज झाले आहेत. उमेदवारांचे "वॉररूम'ही आता सज्ज होत आहेत. पक्षकार्यालयांसोबतच उमेदवारांनी निवासस्थानी व इतरत्रही ते सज्ज केले आहेत. 
सोशल मीडिया हे प्रचाराचे आजच्या युगातले तंत्र आहे. युवक आणि युवतीच नव्हे; आता सर्वच वयोगट सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. पारंपरिक प्रचारात जाहीर सभा, रिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून प्रचार होतच आहे; परंतु सोशल मीडियावरील प्रचार थेट आता उमेदवारांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे पक्षांसह उमेदवारांतर्फे सोशल मीडियाची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येत आहे. 

खासगी संस्थांना मक्ता 
सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी उमेदवार आणि पक्षांतर्फे काही खासगी संस्थांनाही मक्ता देण्यात आला आहे. या संस्थांच्या स्वतंत्र "वॉररूम' आहेत. विशेष म्हणजे मुंबई, पुणे येथील त्यांच्या "वॉररूम'च्या माध्यमातून जळगावमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून संबंधित उमेदवाराचा प्रचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या संस्थांनी प्रत्येक मतदारसंघातील मोबाईलधारकांचा "डाटा' जमा केला आहे. प्रत्येक गावनिहाय या संस्थांकडे "डाटा' असून, त्या माध्यमातून प्रचारयंत्रणा राबविण्यात येत आहे. 

पक्षकार्यालयांसह निवासस्थानी "वॉररूम' 
खासगी संस्थांना सोशल मीडियाद्वारे प्रचाराचा मक्ता देण्यासोबतच काही उमेदवारांनी पक्षकार्यालयांसह निवासस्थानीही "वॉररूम' तयार केले आहेत. आपल्यासंबंधी काही मजकूर आल्यास तसेच पक्षनेत्यांसंदर्भात काही मजकूर आल्यास त्यास उत्तर देण्यासाठीही यंत्रणा उमेदवारांनी सज्ज ठेवली आहे. लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही उमेदवारांनी "वॉररूम'ची तयार केली आहे. भाजप- शिवसेना युतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी पक्षकार्यालयात, तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात "वॉररूम' तयार करण्यात आली आहे; तर कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराची "वॉररूम' सागर पार्कजवळील त्यांच्या "मधुबन' या निवासस्थानी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com