Video जळगावकरांनी ढगाळ वातावरणातही अनुभवले सूर्यग्रहण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

ग्रहांच्या सावलीच्या खेळातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग होता. कर्नाटक, केरळ व तमिळनाडूत हे सूर्यग्रहण कंकणाकृती दिसणार असले तरी उर्वरित भारतात ते खंडग्रास स्वरूपात ते दिसेल. जिल्ह्यात हे खंडग्रास ग्रहण 68 टक्के दिसणार होते; तो अनुभव अनेकांनी घेतला. 

जळगाव : सूर्यग्रहण पाहण्याचा योग आज (ता. 26) आला. अंतराळातील हे अनोखे सौंदर्य पाहण्यासाठी शहरात दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. पहाटेपासून ढगाळ वातावरण असल्याने खगोलप्रेमींचा हिरमोळ झाला होता. मात्र साडेनऊपासून सुर्याला लागलेले ग्रहण पाहण्याचा योग अनुभवण्यास मिळाला. लहान मुलांसह ज्येष्ठांनी देखील हा दुर्मिळ योग दुर्बिणद्वारे पाहिला. 

Image may contain: one or more people, people standing, sky, cloud and outdoor
ग्रहांच्या सावलीच्या खेळातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग होता. कर्नाटक, केरळ व तमिळनाडूत हे सूर्यग्रहण कंकणाकृती दिसणार असले तरी उर्वरित भारतात ते खंडग्रास स्वरूपात ते दिसेल. जिल्ह्यात हे खंडग्रास ग्रहण 68 टक्के दिसणार होते; तो अनुभव अनेकांनी घेतला. 

"कुतूहल'तर्फे गॉगल्सची व्यवस्था 
"कुतूहल' संस्थेतर्फे सूर्यग्रहण पाहण्याची संधी सकाळी आठपासून काव्यरत्नावली चौकात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे टेलिस्कोपद्वारे व गॉगल्स लावूनही सूर्यग्रहण पाहता येणार आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी गॉगल मोफत पुरविले जातील. मात्र, ज्यांना गॉगल विकत हवा असेल तो मिळेल. आगामी सहा महिन्यांत पुन्हा सूर्यग्रहण असणार आहे. येथे अनेकांनी उपस्थिती लावून ग्रहण पाहिले. 

Image may contain: 14 people, people smiling, child and outdoor

"मू.जे.'त टेलिस्कोप 
मू. जे.महाविद्यालयाचा भूगोल विभाग व जळगाव खगोल ग्रुपतर्फे सकाळी साडेसातपासून भूगोल विभागाच्या गच्चीवर उपलब्ध होणार आहे. 13 इंचाच्या टेलिस्कोपमधून सोलर फिल्टरद्वारे सूर्यग्रहण पाहण्याची संधी होती. सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. असे आवाहन भूगोल विभागप्रमुख प्रा. प्रज्ञा जंगले, खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे.

Image may contain: sky, cloud and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Solar Eclipse