अविरत विजेसाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा योजना ः ऊर्जामंत्री बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

जळगाव ः भारनियमन होत असल्याने शेतकरी आणि वीज ग्राहकांना त्रास होत असतो. परंतू, शेतकऱ्यांना दिवसातून किमान पंधरा तास वीज मिळू शकेल; या दृष्टीने राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा योजना राबविणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दीपनगर येथे केली. 

जळगाव ः भारनियमन होत असल्याने शेतकरी आणि वीज ग्राहकांना त्रास होत असतो. परंतू, शेतकऱ्यांना दिवसातून किमान पंधरा तास वीज मिळू शकेल; या दृष्टीने राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा योजना राबविणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दीपनगर येथे केली. 

"महावितरण'च्या जळगाव मंडळ अंतर्गत पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतंर्गत दहिवद (ता. अमळनेर), तालखेडा (ता. मुक्‍ताईनगर), बक्षिपूर (ता. रावेर) आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतंर्गत सावदा, रावेर, फैजपूर, अमळनेर, भडगाव या 33/11 के.व्ही. उपकेंद्राच्या कामांचा ई- भूमिपुजन समारंभ आज (ता.30) दीपनगर (ता. भुसावळ) येथे पार पडला. यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. बावनकुळे म्हणाले, की मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेतंर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींनी गायरान जमिनी देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला ट्रान्सफॉर्म देण्याबाबतची घोषणा देखील त्यांनी केली. दीपनगर येथे उभारण्यात येत असलेल्या महानिर्मिती प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तर शेतकऱ्यांकडे असलेल्या थकित बिलाची मुद्दल रक्‍कम भरल्यास त्यांना थकबाकीच्या रक्‍कमेवरील दंड व व्याज माफ करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी. नाना पाटील, खासदार रक्षा खडसे आदी उपस्थित होते. 

नाथाभाऊ तुम्ही राज्याचे मंत्री ः मंत्री महाजन 
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या महिन्यात दिल्ली येथे जात होते. यावर बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की नाथाभाऊ आम्ही तुम्हाला दिल्लीत जावू देणार नाही. तुम्ही आमचे जिल्ह्याचे व राज्याचेच मंत्री असल्याचे महाजन म्हणाले.

Web Title: marathi news jalgaon sourpraklp urjamantri bavankule