मेजर ध्यानचंद यांना "मरणोत्तर भारतरत्न' द्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हॉकी प्रशिक्षण केंद्र व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी खेळाडूंनी केली. 

याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ, अशोक चौधरी, एकलव्य पुरस्कारार्थी कांचन चौधरी, फारुक शेख, ऍथलेटिक संघटनेचे राजेश जाधव, डॉ. रेदासनी, महापालिकेचे क्रीडाधिकारी किरण जावळे, जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, एम. के. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याला नावालैकिक प्राप्त करून देणाऱ्या 140 खेळाडूंचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच 45 शाळांचाही गौरव करण्यात आला. प्रशांत जगताप यांनी सूत्रसंचालन केले. 
याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला "हॉकी- महाराष्ट्र'चे उपाध्यक्ष फारुक शेख यांनी पुष्पांजली वाहिली. इमरान शेख व भाग्यश्री कोळी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावरील माहितीपट खेळाडूंसमोर सादर केला. आंतरराष्ट्रीय आर्बिटर प्रवीण ठाकरे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. 
कार्यक्रमाला बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रा. अनिता कोल्हे, क्रीडाधिकारी एम. के. पाटील, रेखा पाटील, सुजाता गोल्हाणे, अरविंद खांडेकर, हॉकीचे प्रशिक्षक लियाकत अली, मुजफ्फर शेख, क्रीडाशिक्षक विवेक आळवणी, नरेंद्र भोई, सत्यनारायण पवार, अनिता पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील क्रीडाशिक्षक व क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती. प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडाशिक्षक विवेक आळवणी यांनी आभार मानले. 

Web Title: marathi news jalgaon sport day mejar dyanchand