जळगाव जिल्ह्याचा दहावीचा 88 टक्‍के निकाल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

जळगाव ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल आज (ता.8) ऑनलाईन जाहीर झाला. यात जळगाव जिल्ह्याचा निकाल 88.08 टक्‍के इतका लागला. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुलींच अव्वल ठरल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. नाशिक विभागाचा निकाल 87.42 टक्के लागला. खानदेशात 88.08 टक्‍क्‍यांसह जळगाव अव्वल राहिले. त्यापाठोपाठ धुळे 87.51 तर नंदुरबारचा 80.74. टक्के निकाल लागला. दहावी परिक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुलीच अव्वल राहिल्या. 
जळगाव जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या परीक्षेला 35 हजार 105 मुलांनी तर 25 हजार 137 मुलींनी दहावी परीक्षा दिली. एकुण 60 हजार 242 विद्यार्थ्यांपैकी 53 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच धुळे जिल्ह्यातील 29 हजार 98 विद्यार्थ्यांपैकी 25 हजार 463 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर नंदुरबार जिल्ह्यातील 20 हजार 431 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 497 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

Web Title: marathi news jalgaon ssc result