उत्पन्नात जळगाव विभाग राज्यात तिसऱ्या स्थानावर! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाकडून वर्षभरात फेऱ्यांचे योग्य शेड्यूल आणि जादा बसचे नियोजनाने उत्पन्न वाढीवर परिणाम झालेला पाहण्यास मिळाला. उत्पन्न मिळविण्यात राज्यातील 31 जिल्ह्यांपैकी जळगाव विभाग नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात राज्यात तिसऱ्या स्थानावर आले आहे. 

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाकडून वर्षभरात फेऱ्यांचे योग्य शेड्यूल आणि जादा बसचे नियोजनाने उत्पन्न वाढीवर परिणाम झालेला पाहण्यास मिळाला. उत्पन्न मिळविण्यात राज्यातील 31 जिल्ह्यांपैकी जळगाव विभाग नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात राज्यात तिसऱ्या स्थानावर आले आहे. 
राज्य परिवहन महामंडळाच्या बस ग्रामीण भागात प्रवाशी वाहतुक करत असतात. महामंडळाच्या बसला अवैध प्रवाशी वाहतुकीचा अडसर असताना, या अडथळ्यातून प्रवाशी वाहतूकीच्या योग्य नियोजनातून जळगाव विभागाला उत्पन्न वाढविण्यास मदत झाली. जळगाव विभागात एकूण 847 बस आणि 22 शिवशाही बस आहे. या बस सोडण्याचे योग्य नियोजनासोबत गर्दीच्या हंगामात म्हणजे दिवाळी, लग्नसराई तसेच मनुदेवी, वणीचा गड यात्रोत्सवा दरम्यान जादा बस सोडण्याचे नियोजन आखण्यात आले. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 26 कोटी 78 लाख 95 हजार रूपयांनी उत्पन्नात वाढ झाली. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत 50 वाहने कमी आणि 96 चालक आणि 206 वाहक संख्या देखील कमी लागली आहे. 
 
गतवर्षी 236 कोटी 
परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने गेल्या आर्थिक वर्षात 236 कोटी 80 लाख 22 हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. त्यातुलनेत यंदा 26 कोटी 78 लाख 95 हजार रूपयांचे उत्पन्नात वाढ होवून यंदा विभागाला 263 कोटी 59 लाख 17 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मिळवून जळगाव विभागात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

शिवशाही मात्र तोट्यात 
महामंडळाच्या ताफ्यात दोन वर्षांपासून खासगी ट्रॅव्हल्स्‌चा समावेश करून एसी स्लिपर आणि सेमी स्लिपर शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. जळगाव विभागात एकूण 22 शिवशाही बस असून लांबपल्ल्यावर त्या सोडण्यात येत आहेत. परंतू याचे भाडे अधिक असल्याने याला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने शिवशाही बस रिकाम्या धावत आहेत. यामुळे अनेक शिवशाही फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. यात नुकताच चोपड्याहून पुणेसाठी सुटणारी शिवशाही बस बंद करून ती जळगावहून सोडण्यात येणार आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडणारी नसल्याने प्रवाशांअभावी शिवशाही तोट्यात जात आहे. 

Web Title: marathi news jalgaon st mahamandal jalgaon divigen 3rd state