जळगावमध्ये साकारला "संडे फॅशन स्ट्रीट" 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 एप्रिल 2018

जळगावमध्ये साकारला "संडे फॅशन स्ट्रीट" 

जळगावः रविवार सुटीचा दिवस... या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयांसह बहुतांश दुकानेही बंदच असतात. तरीही येथील नेहरू चौक परिसर रविवारीही गजबजलेला असतो तो "संडे मार्केट'ने. रस्त्यावर विविध वस्तूंची विक्री होत असल्याने दरही स्वस्त असतात. यामुळे रविवारीही विविध वस्तू घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत विशेषतः युवकांच्या गर्दीने नेहरू चौक फुललेला दिसतो. यामुळे या रस्त्याला "संडे फॅशन स्ट्रीट' म्हणून संबोधिले जात आहे. 

शोरूम, व्यापारी संकुलातील दुकानांत रेडिमेड कपड्यांचा दर अधिक असतो. ठरावीक वर्गातील नागरिक तेथून खरेदी करतात. मात्र, ज्यांचे उत्पन्न सर्वसाधारण आहे, अशांना "संडे मार्केट'मध्ये मनासारखे कपडे, विविध वस्तू रास्त दरात मिळतात. यात प्रामुख्याने जिन्स, टी शर्ट, हाफ टी शर्ट, लेगीन्स, टेरिकॉट, कॉटनचे विविध प्रकारचे कपडे, बूट, चप्पल, बेल्ट, बनियन, रुमाल, नाईट ड्रेस, अत्तर, लहान मुलांचे कपडे आदी असंख्य वस्तू येथे शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत उपलब्ध असतात. काही ठिकाणी दीडशे रुपयांत दोन हाफ टी शर्ट, तीनशे रुपयांत जिन्स पॅट उपलब्ध असते. यामुळे सर्वसाधारण नागरिकांचा "संडे मार्केट'मधील वस्तू घेण्याकडे अधिक कल असतो. 

पन्नास जणांना रोजगार 
"संडे मार्केट'मध्ये सुमारे पन्नास विक्रेते होलसेल दरात सुरत, गुजरात, मुंबई येथून विविध प्रकारचे कपडे, वस्तू आणतात. ते रविवारी "संडे मार्केट'मध्ये विकतात. यातून त्यांना किमान रोजगार उपलब्ध होतो. एरवी बाजारात या विक्रेत्यांना विक्री करण्यासाठी जागा नसते आणि असली तरी वाहतूक पोलिस, महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारवाई होते. यामुळे हे विक्रेते रविवारीच बंद दुकानांच्या समोर कपडे, वस्तूंची विक्री करतात. 

इन्फोबॉक्‍स 
असोसिएशन स्थापन 

नेहरू चौकात भरणाऱ्या बाजारातील सतरा विक्रेत्यांनी नेहरू चौक हॉकर्स कल्याणकारी संस्थेची स्थापना केली आहे. त्याद्वारे ते सामाजिक उपक्रम राबवितात. विक्रेत्यांच्या अडचणी सोडवितात. साबीर शेख करीम हे या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 

कोट... 
रविवारी सकाळी आठपासून आम्ही विक्री सुरू करतो. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे नेहरू चौकाची "संडे फॅशन स्ट्रीट' अशी नवी ओळख तयार करीत आहोत. आम्ही केवळ हॉकर्स नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रमही राबवितो. 
- सुशील सागर, विक्रेता. 

Web Title: marathi news jalgaon strit