स्ट्रॉंगरुमवर दिल्लीच्या पोलिसांचा बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची यंत्रे आजपहाटेच पोलिस बंदोबस्तात निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आली. सहा केंद्रीय पोलिस दल (सीएपीएफ प्लाटून), जळगाव पोलिसांचे शस्त्रधारी गार्ड, चार पोलिस अधिकाऱ्यासह 20 पोलिसांचा बंदोबस्त या स्ट्रॉंगरूमवर सतत चोवीस तास पहारा ठेवून असेल. 

स्ट्रॉंगरूम यंत्रे ठेवल्यानंतर त्याची नोंद निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत घेतली गेली आहे. त्यानंतर स्ट्रॉंगरुमला सील केले आहे. आता ही स्ट्रॉंग रूम 23 मेस सकाळी उघडण्यात येईल. 

जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा मतदान यंत्रे आज पहाटे पाचपर्यंत जळगाव एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात आणण्यात आली. तत्पूर्वीच पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला होता. आज सकाळी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व मतदान यंत्रे गोदामात ठेवण्यात आली. मतदार संघ निहाय मतदान यंत्राचा आढावा निवडणूक निरीक्षकांनी घेतला. त्यानंतर दुपारी तीनला मतदान यंत्रे स्ट्रॉंगरूम मध्ये सील करण्यात आली. या स्ट्रॉंगरूमवर सतत चोवीस तास निवडणूक निकाल लागेपर्यंत (23 मे) पहारा ठेवण्यात येणार आहे. स्ट्रॉंगरूमवर दुर्बिणीच्या साहाय्याने नजर ठेवता येण्यासाठीची उंच मनोरा उभारण्यात आला आहे. 

उमेदवार, प्रतिनिधींना करता येईल पहारा 
स्ट्रॉंगरूमवर उमेदवार किंवा प्रतिनिधींना पहारा करण्याची इच्छा असल्यास ते स्ट्रॉंगरूमबाहेर पहारा देवू शकतील. स्ट्रॉंगरूममधील व्हीडीओ चित्र बाहेर दिसेल. 

मतदान यंत्रे स्ट्रॉंगरूममध्ये सील करून ठेवण्यात आली आहेत. त्यावर कडक असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरूममध्ये सीसीटीव्ही ठेवला आहे. त्याचे चित्र बाहेर दिसेल. स्ट्रॉंगरूमवर पहारा उमेदवारासह त्यांच्या प्रतिनिधीला ठेवता येईल. 
-डॉ. अविनाश ढाकणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी 

Web Title: marathi news jalgaon strong room delhi police