विद्यार्थी वळताहेत कौशल्य आधारित शिक्षणाकडे! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय, अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांकडे ओढा होता. यामुळे प्रत्येक ठिकाणी डॉक्‍टर, इंजिनिअर यांची संख्या वाढली आहे. परिणामी या क्षेत्रातील नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. यामुळे आजच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञाच्या युगात युवकांना लवकर नोकरीच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध होतील, असे अभ्यासक्रम घेण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. त्यातच सध्या अभियांत्रिकी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. 

भविष्यामध्ये कौशल्य विकासाला अधिक महत्त्व येईल. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (एमसीव्हीसी), तंत्रनिकेतन (आयटीआय), यासह तत्काळ रोजगार देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असेल. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कौशल्य आधारित शिक्षणाकडे कल वाढला आहे. 
शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपारिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे करिअर सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळे कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्‍चित फायदा होतो. त्यामुळे राष्ट्रीय व राज्य पातळीवर याची दखल घेऊन सरकारने बी. व्होक, कम्युनिटी कॉलेज, डी. डी. कौशल्य व एनएसक्‍युएफ यांसह अनेक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांना शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. 

तंत्रज्ञानाकडे अधिक कल 
सध्या विद्यार्थ्यांचा तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षणाकडे कल वाढला आहे. दोन व तीन वर्षांत शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या संधी लवकर मिळत असल्याने विद्यार्थी या शिक्षणावर अधिक भर देतात. यात युवतींसाठी स्वतंत्र कोर्सेस देखील उपलब्ध आहे. 
 
सध्या पारंपरिक अभ्यासक्रमांकडे तरुणाईचा कल कमी होत आहे. शिक्षण सुरू असताना नोकरीच्या संधी कशा मिळतील, अशा प्रकारचे शिक्षण घेण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. यात युवतींसाठी देखील अनेक अभ्यासक्रम असून त्यात ग्रामीण भागातील युवतींचा मात्र समावेश कमी आहे. 
- प्रा. जयेंद्र लेकुरवाळे (समन्वयक) 

पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन भविष्य काळात नोकरीच्या संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे मी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. 
- दिव्या पाटील (विद्यार्थिनी) 

Web Title: marathi news jalgaon Student education