जळगाव जिल्ह्यात दोघांचा उष्म्याने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

जळगाव : सालबर्डी (ता. मुक्‍ताईनगर) येथे मजुरी काम करताना वृद्धाचा, तर रावेर येथे तरुणाचा आज उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. 
सालबर्डी येथे सचिन कोळी यांच्या प्लॉटमध्ये काम करीत असताना निमखेडी खुर्द येथील पुंडलिक चांगो चौधरी (वय 60) यांना अचानक भोवळ आली व जमिनीवर पडले. या ठिकाणी जागीच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा उष्माघाताचा बळी असल्याचे सांगितले. 

रावेर येथील शिवाजी चौकातील कांचन मुरलीधर शिंदे (वय 29) हा काल (ता. 13) त्यांच्या शेतात दिवसभर पाइपलाइनचे काम करीत होता. त्याला उलटी, मळमळ, चक्कर असा त्रास होऊ लागला. सायंकाळी तो डॉ. अनंत अकोले यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेला. त्याच्यावर उपचारही झाले. परंतु, आज सकाळी कांचनला त्रास होऊ लागल्याने डॉ. अकोले यांनी त्याला पुन्हा सलाईन लावली. सायंकाळी तो पुन्हा डॉ. अकोले यांच्याकडे आला, तेव्हा त्याला पुन्हा चक्कर येऊ लागल्याने त्यांनी डॉ. दत्तप्रसाद दलाल यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी तिथे नेले, मात्र तत्पूर्वीच त्याचे निधन झाले होते.

Web Title: marathi news jalgaon sunstroke death