सुप्रिम कॉलनी परिसरात आग; 14 पार्टीशनचे घरे खाक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

जळगाव, ता. 23 ः शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील कुबानगरात पार्टीशनच्या घरांना लागलेल्या आगीत 14 घरे जळून खाक झाली. सदर घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली असून, यात दोन जण जखमी झाले आहेत. तर 12 बकऱ्या आणि 20 कोंबड्या दगावल्या आहेत. 

जळगाव शहरात पार्टीशनच्या घरांना आग लागण्याची ही महिनाभरातील तिसरी घटना आहे. गेल्या आठवड्यातच शिवाजीनगर परिसरात लागलेल्या आगीत दहा घर जळाली होती. तशाच प्रकारची घटना आज (ता.23) पहाटे साडेतीनच्या सुमारास कुबानगरात घडली. एकाला लागून एक असलेल्या 14 पार्टीशनच्या घरात आठ परिवार वास्तव्यास होते. घराच्या बाजूला असलेल्या दर्गात सुरू असलेल्या दिव्यामुळे लाकडाने पेट घेतल्याने घरांना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. आगीत सर्व चौदा घर जळाली असून, यात घरातील संसारपयोगी वस्तू देखील जळून खाक झाल्या आहेत. आगीमुळे एका सिलेंडरचा स्फोट देखील झाला. आग वाढण्याच्या अगोदरच एका बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात यश मिळाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. यामुळे आठ परिवार उघड्यावर आले आहे. रिकाम्या घरांमध्ये कोंडून ठेवलेल्या कोंबड्या आणि बकऱ्या दगावल्या आहेत.

Web Title: marathi news jalgaon suprime colony aag