esakal | सुरतमध्ये मजुरांची उमासमार; खानदेशच्या या दोन खासदारांची मदत 
sakal

बोलून बातमी शोधा

raksha khadse c r patil

सुरत येथे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांबाबत खासदार रक्षा खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, सुरत जिल्ह्यात अडकलेल्या कामगाराबाबत जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला सांगितले. त्यांना ते राहत असलेल्या ठिकाणाचे लोकेशनही सांगता येत नव्हते. आपण त्याची माहिती घेवून त्यानंतर खासदार सी. आर. पाटील यांना त्या कामगारांना मदत करण्याबाबत फोनवरून सांगितले, त्यानुसार त्यांनी तातडीने त्यांना मदत केली. 

सुरतमध्ये मजुरांची उमासमार; खानदेशच्या या दोन खासदारांची मदत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अनेक नागरिक गुजरात राज्यातील सुरत, बडोदा येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. "लॉकडाऊन'मुळे अनेकांना समस्या निर्माण झाल्या आहेत. उपासमारीची वेळ देखील अनेकांवर आली आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदार संघातील खासदार रक्षा खडसे यांनी सुरतचे भाजपचे खासदार सी. आर. पाटील यांना फोन करून त्या रहिवाशांची माहिती दिली. यानंतर पाटील यांनीही ताबडतोब त्या रहिवाशांना अन्नथान्य किराणा साहित्य पोहोच केल्याने मजुरांची उपासमार थांबली. 

जळगाव जिल्ह्यातील अनेक कुंटूबे नोकरी तसेच व्यवसायानिमित्त गुजरात राज्यातील बडोदा, सुरत, नवसारी या भागात स्थायिक आहेत. "कोरोना'मुळे "लॉकडाऊन' सुरू असल्याने अनेक लोक अद्यापही घरी परतु शकलेले नाहीत. जळगाव जिल्ह्यातील असेच 50 जण कामधंद्यानिमित्त सुरत येथे गेले आहेत. ते सुरत जिल्ह्यातील गोडादरा येथील निळकंठ सोसायटीत राहतात. त्या ठिकाणी मजुरी करून ते आपली उपजिविका भागवित आहेत. 

नातेवाईक पोहचले खासदारांकडे 
"लॉकडाऊन'मुळे त्यांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या घरातील खाण्याचे साहित्य संपले. त्यामुळे त्यांचे दररोज खाण्यापिण्याचे हाल होत होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून अडचणीची माहिती दिली. परंतु नातेवाईकही त्यांना मदत करण्यास असमर्थ होते. त्यांनी जिल्ह्यातील रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी या 50 जणांबाबत सर्व माहिती त्यांना दिली, आणि त्यांना मदत करावी अशी विनंती केली. 

अन्‌ अशी झाली सोय 
खासदार रक्षा खडसे यांनीही तातडीने सुरत येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार सी. आर. पाटील यांना फोन लावला, त्यांना निळकंठ सोसायटीत राहत असलेल्या या लोकांची माहिती देत त्यांना मदत करण्याचे विनंती केली. खासदार पाटील यांनीही तातडीने आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या गरजू पन्नास लोकांना धान्य तसेच किराणा साहित्य पाठविले. नातेवाईकांनी रक्षा खडसे व खासदार पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. सुरत जिल्ह्यातील नवसारी येथील भाजपचे खासदार सी. आर. पाटील हे मूळ जळगाव जिल्ह्याचेच रहिवासी आहेत. मुक्ताईनगर तालुक्‍यातील पिंप्री अकाराऊत हे त्यांचे जन्मगाव आहे. जिल्ह्याचे असलेले नाते कायम असून जळगाव येथे त्यांचे निवासस्थान आहे.