सुरेशदादांच्या मार्गदर्शनासाठी राजूमामा "बंगल्या'वर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जळगाव ः महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही शांत झाल्या... मात्र, ज्या मुद्यावर भाजपला एकहाती सत्ता मिळाली, त्या मुद्याला अनुसरून आज आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी थेट सुरेशदादा जैन यांचे निवासस्थान गाठत त्यांची सदिच्छा भेट घेतली. तासभर झालेल्या चर्चेत राजूमामांनी शहर विकासासाठी ज्येष्ठ नेते म्हणून आपला सल्ला मार्गदर्शक ठरेल, अशी भूमिका मांडल्यानंतर जैनांनीही या भूमिकेशी सहमती दर्शवली. 

शहराचा विकास करु या आश्‍वासनावर भाजपने महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली. विकासासाठी सर्वांनाच सोबत घेऊन काम करण्याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ग्वाही दिली होती. सुरेश भोळेंनी ही भूमिका कायम ठेवत आज दुपारी सुरेशदादांची त्यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान दोघांमध्ये शहराच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. 

कर्ज, गाळेप्रश्‍नावर चर्चा 
जैन व भोळेंमध्ये झालेल्या चर्चेत प्रामुख्याने हुडको कर्ज, जेडीसीसी बॅंक कर्ज, गाळेप्रश्‍न, हॉकर्स आणि शहराच्या विकासासंदर्भातील विषय होते. विकासासाठी सहकार्य करण्यासह ज्येष्ठ म्हणून मार्गदर्शनाची अपेक्षा आमदार भोळेंनी जैन यांच्याकडे व्यक्त केली. यावर जैन यांनी शहराच्या विकासासाठी आमची काहीही अडचण राहणार नाही, विकासासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करु, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक अमर जैन, जितेंद्र मुंदडा, अमोल सांगोळे, प्रमोद नाईक, बाबूशेठ श्रीश्रीमाळ उपस्थित होते. 
शहराच्या विकासात सर्वांचेच सहकार्य अपेक्षित असल्याच्या भूमिकेतून आमदार भोळेंनी तीन दिवसांपूर्वी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची तर आज जैन यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते गफ्फार मलिक यांचीही भेट घेतली. 
 
शहराच्या विकासासाठी सहकार्याच्या भूमिकेतून या सदिच्छा भेट घेत आहे. शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिकांचीही आपण भेट घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेऊ. 
- सुरेश भोळे, आमदार

Web Title: marathi news jalgaon suresh jain MLA bhole