जळगावपेक्षा भुसावळ स्वच्छ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

जळगाव ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत मागील वर्षी भुसावळ शहर सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर होते. 2017-18 या स्वच्छ सर्व्हेक्षणात भुसावळ शहराने 69 क्रमांक मिळवत स्वच्छ शहराला म्हणजे जळगावला मागे सोडले. स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव 84 स्थानावर असल्याचे केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या संकेतस्थळावर आज जाहीर करण्यात आले आहे. 

स्वच्छ भारत अभियानासाठी देशभरातील 4 हजार 41 शहरांची निवड केली होती. यात 2018 च्या स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी अमृत योजनेत समाविष्ट असलेले 550 शहरे आणि योजनेत समाविष्ट नसलेले 3 हजार 491 शहरांचे केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण समितीने सर्वेक्षण केले होते. स्वच्छतेबाबत 4 हजार गुणांचे असलेले सर्वेक्षण राज्य आणि केंद्र समितीकडून 26 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत झाले. सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार भुसावळ शहराला 2 हजार 722 गुण मिळवून 69 व्या स्थानावर तर जळगाव महापालिकेला 2 हजार 634 गुण मिळवून 84 क्रमांक मिळविला आहे. 

जामनेर, वरणगावचाही समावेश 
स्वच्छ सर्वेक्षणात अमृत योजनेत समाविष्ट नसलेल्या शहरांमध्ये जिल्ह्यातील जामनेर आणि वरणगाव शहराचा समावेश होता. यामध्ये जामनेर 46 तर वरणगाव शहराने 75 व्या क्रमांकावर स्थान पटकाविले.

Web Title: marathi news jalgaon swach bhusawal