प्रत्येक घराचे स्वच्छतेबाबत होणार सर्वेक्षण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

जळगाव ः शहरात प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व 
19 प्रभागात स्वच्छतेचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात प्रत्येक घरातून ओला- सुका कचरा वेगळा घेण्यापासून तर उघड्यावरील टाकलेला कचऱ्याचे ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचे काम आरोग्य निरीक्षकांकडून केले जाणार आहे. लवकरच या सर्वेक्षणाला शहरात सुरवात होणार आहे. 

शहरातील दैनंदिन स्वच्छतेसाठी खासगी मक्तेदाराला स्वच्छतेचा ठेका महापालिकेने दिलेला आहे. त्यानुसार त्यांच्याकडून काम देखील सुरू आहे. परंतु शहरात अजून प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी प्रत्येक प्रभागातील स्वच्छतेचा सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार प्रभागात काय अंमलबजावणी करता येईल याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून "ऍक्‍शन प्लॅन' तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरातून ओला व सुका कचरा प्रत्येक घरातून वेगळा घेण्यावर महापालिकेचा भर असणार आहे. 

प्रभागानुसार स्वच्छतेचा अहवाल 
शहरात नवीन प्रभाग रचनेनुसार 19 प्रभाग असून चार प्रभाग समिती अंतर्गत हे प्रभाग विभागले आहे. स्वच्छता मोहीम सुरू करण्यापूर्वी सर्व प्रभागात महापालिकेचे आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक, मुकर्दम, कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाची जबाबदारी दिली जाणार आहे. प्रभागातील प्रत्येक घर, गल्लीतील स्वच्छतेच्या समस्यांबाबत तसेच किती कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता लागेल अशा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. 

असा असेल "ऍक्‍शन प्लॅन' 
- प्रभागातील घरांची संख्या 
- प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी जाते का? ओला- सुका कचरा येतो का 
- घंटागाडीचा रुट, वेळेत जाणे. 
- कचरा कुंड्यांची संख्या, उघड्यावरील कचऱ्याचे ठिकाण शोधणे. 
- प्रभागात कामगार किती, किती आवश्‍यकता. 
- उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, प्लॅस्टिक कारवाई 
- हॉटेल वेस्ट कचरा संकलन करणे, कंपोस्ट करणे. 

महापालिकेतर्फे शहरात लवकरच शाश्‍वत स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी शहरातील प्रभागानुसार सर्वेक्षण करून अस्वच्छतेच्या समस्या कायम स्वरूपी सोडविण्यासाठी मायक्रो लेव्हलपर्यंत उपाययोजना केल्या जाणार आहे. तसेच नागरिकांमध्ये ओला-सुका कचरा वेगळ्या देण्याची जनजागृती व त्यांना सक्ती केली जाणार आहे. 
- मिनीनाथ दंडवते, उपायुक्त (आरोग्य विभाग) जळगाव. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon swachata mohim muncipal corporatiomn