सफाई न दिसल्यास मक्ता रद्द करा : आमदार भोळे 

सफाई न दिसल्यास मक्ता रद्द करा : आमदार भोळे 

जळगाव ः शहरातील साफसफाईबाबत तक्रारी येत असून, वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तरीही तक्रारींचे निरासन केले जात नाही. त्यामुळे आठ दिवसांत साफसफाईबाबत सुधारणा न दिसल्यास मक्ता रद्दची कारवाई करू, अशी तंबी देऊन आमदार सुरेश भोळे यांनी मक्तेदाराच्या प्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

शहरातील स्वच्छता मक्‍त्याच्या कामकाजाचा आढावा महापौर सीमा भोळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. आमदार भोळे, आमदार चंदुलाल पटेल, उपमहापौर अश्‍विन सोनवणे, सभापती जितेंद्र मराठे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, "वॉटर ग्रेस'चे व्यवस्थापक डॉ. चंद्रकांत भंगाळे यांच्यासह आरोग्य अधीक्षक, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. साफसफाईचा 71 कोटींचा मक्ता देण्यात आला आहे. याबाबत नागरिकांकडून कर आकरला जात असून, त्यातुलनेने साफसफाई दिसून येत नाही. वारंवार सूचना देऊनही तक्रारी वाढतच आहेत. मक्तेदाराच्या प्रतिनिधींना आठ दिवसांत सुधारणा न केल्यास नवव्या दिवशी मक्ता रद्द करण्याची कारवाई करू, असा इशारा आमदारांनी यावेळी दिला. 

केवळ उपायुक्त फिरतात 
साफसफाईची जबाबदारी मक्तेदारांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यास दोघांवरही कारवाई करू. साफसफाईच्या पाहणीसाठी उपायुक्त सकाळी फेरफटका मारून करताना दिसतात. मात्र, "आरोग्य'चे अधिकारी कुठे दिसत नाहीत, असे म्हणत आमदारांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

आता काय उत्तर देऊ...? 
मक्ता दिल्यामुळे शहरातील चांगली साफसफाई होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे "कचरा दाखवा- बक्षीस मिळवा' असा दावा करण्यात आला होता. आता काय उत्तर देऊ, अशा शब्दांत साफसफाईबाबत आमदार सुरेश भोळे यांनी नाराजी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com