आराखडा 22 कोटींचा; मिळाले फक्त पाच कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

जळगाव : जिल्ह्यात सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदाही पाणीटंचाई सुरू आहे. मे अखेर 859 गावांना पाणीटंचाई जाणवेल, असा अंदाज असला तरी त्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत. वाढणारी गावे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन 22 कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत केवळ 4 कोटी 74 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 

मुक्ताईनगर, अमळनेर, बोदवड, भडगाव, पारोळा तालुक्‍यात पाणीटंचाई आहे. सरासरीच्या 70 टक्केच पाऊस झाला. यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. सध्या जामनेर, भुसावळ, अमळनेर, पारोळा या तालुक्‍यातील 80 गावांना 44 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी याच तालुक्‍यात टंचाईग्रस्त गावातील विहिरींचे अधिग्रहणाची कामे जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहेत. 
 
अशा आहेत उपाय योजना 
जिल्हा प्रशासनाचा 859 गावांच्या पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखडा तयार झाला. त्यात तब्बल 1 हजार 468 उपाय योजना केल्या आहेत. 22 कोटी 58 लाख 4 हजारांची तरतूद पाणी टंचाईवर केली आहे. त्यात अस्तित्वात असलेल्या नळ योजनांची दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक नळ योजना सुरू करणे, टॅंकरने अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विंधन विहिरींची अधिग्रहण करणे, विहिरीतील गाळ काढणे, बुडक्‍या घेणे आदी योजनांचा समावेश आहे. 
त्यापैकी गरजेनुसार त्या त्या गावांमध्ये तात्पुरती पाणी योजना, आडवे बोअर करणे, विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहीर करणे अशी कामे सुरू आहेत. 
 
खर्च होऊनही टंचाईची ओरड कायम 
पाणीटंचाईबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत टंचाईचे कामे हलगर्जीपणाने होत असल्याचा आरोप केला. मुक्ताईनगर तालुक्‍यात तीन तीन महिने टंचाईचे प्रस्ताव पडून राहतात. ते जळगावला मंजुरीला कधी येतील, मंजूर केव्हा होतील? याबाबत चिंता व्यक्त करीत अनेक नागरिकांनी पाण्याअभावी गावे सोडल्याचे सांगितले. यावरून जिल्हा प्रशासन किती गंभीर असल्याचे दिसून येते. 
 
संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या अशी 
तालुका---गावे 
अमळनेर--132 
भडगाव--30 
भुसावळ--30 
बोदवड--28 
चाळीसगाव--90 
चोपडा--38 
धरणगाव--49 
एरंडोल--40 
जळगाव--32 
जामनेर--134 
मुक्ताईनगर--37 
पाचोरा--100 
पारोळा--74 
रावेर--10 
यावल--35 
एकूण -859 
 
Web Title: marathi news jalgaon tanchai