उन्हाच्या चटक्‍यासह वाढल्या... टंचाईच्या झळा 

residentional photo
residentional photo

जळगाव : सुवर्णबाजारपेठ, केळी-कपाशीचे हब म्हणून ओळख असलेला जळगाव जिल्हा गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईचा जिल्हा म्हणून ओळख उदयास येत आहे. आज अखेरपर्यंत 115 गावांना 91 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी जोपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना राबविल्या जात नाही. तोपर्यंत मार्च ते मे दरम्यान, पाण्यासाठी महिला, नागरिक, लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागेल. तूर्त तरी पाण्यासाठी चारही दिशांना नागरिकांची भटकंती होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी नागरिकांनीच पावसाचे पडणारे पाणी आपल्याच परिसरात जिरविण्यासाठी जलसंधारणाची चळवळ हाती घेतल्यास पाण्यासाठी भटकंती थांबेल हे निश्‍चित. 
 
जळगाव जिल्ह्यात गतवर्षी दोनशे टॅंकरने पाणीपुरवठा झाला. पाऊस जेमतेम सत्तर टक्के झाला. यामुळे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिक, महिलांना रोजंदारीची कामे बाजूला सोडून पाण्यासाठी ठिकठिकाणी डोक्‍यावर हंडे घेऊन भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागात नागरिक सायकल, बैलगाडी, रिक्षा, मॅटेडोरमध्ये भांडी ठेवून पाणी कोठे मिळते याचा शोध घेऊन पाणी भरताना दिसतात. जामनेर, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, बोदवड हे तालुके तीव्र पाणीटंचाईच्या छायेत आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होऊनही पाण्याची कमतरता भासत असल्याचे चित्र आहे. पाणीटंचाईसारख्या गंभीर विषयावर जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यातच पाणी त्या त्या गावात जिरेल याची व्यवस्था केल्यास आगामी काळात तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच दक्षता घेण्याची गरज आहे. 
 

आकडे बोलतात... 
टंचाईसाठी आराखडा-- 22 कोटी 58 लाखांचा 
संभाव्य टंचाईचे गावे-- 859 
मंजूर निधी--4 कोटी 74 लाख 51 हजार 600 
खर्च निधी --3 कोटी 97 लाख 69 हजार 332 
शिल्लक निधी--76 लाख 82 हजार 268 
 
गतवर्षी पाऊस कमी झाल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. त्यावर प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. ज्या गावांना टॅंकरची मागणी होईल त्यांना लागलीच टॅंकर मजूर केला जात आहे. 
- किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com