अटकेतील टोळीनेच लांबविला  भिवंडीतून नाफ्याचा टॅंकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

अटकेतील टोळीनेच लांबविला 
भिवंडीतून नाफ्याचा टॅंकर 

अटकेतील टोळीनेच लांबविला 
भिवंडीतून नाफ्याचा टॅंकर 

जळगाव : छत्तीसगड येथून गुजरातकडे लोखंडी बीम घेऊन जाणाऱ्या ट्रालाचालकाचे अपहरण करून माल लंपास केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी आजवर आठ संशयितांना अटक करून कारागृहात रवाना केले आहे. गुन्ह्यातील "मास्टरमाईंड' अद्यापही मोकाट असून, धावत्या ट्रकवर दरोडे टाकणाऱ्या या टोळीनेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-निजामपूर हद्दीतून पेट्रोलियम द्रावण "नाफ्ता'ने भरलेला टॅंकर लुटून नेला व नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समोर येत आहे. भिवंडी पोलिस संशयितांच्या अटकेसाठी गेल्या दोन दिवसांपासून जळगावला ठाण मांडून आहेत. चौकशीअंती या टोळीची ठाण्याला रवानगी होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 
रायगड जिंदल (छत्तीसगड) येथून लोखंडी बीम घेऊन निघालेला ट्रॉला जुनागडकडे (गुजरात) जात असताना नांदुऱ्याजवळ इनोव्हा कारमधील (एमएच 22, डी 700) दरोडेखोरांनी पाठलाग करीत ट्रॉला अडवला. चालकास खंजीर व रिव्हॉल्वरचा धाक दाखवत 23 लाख 40 हजार रुपये किमतीचे लोखंडी बीम घेऊन जाणारा ट्राला लुटला. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिस पथकाने शेख हसन शेख सलीम, शेख फारुख शेख जमाल, शाबीर शाह अमान शाह, आरिफ शाह सुभान शाह, शेख अमिर शेख गुलाब, शेख लतीफ शेख भिकन या संशयितांना अटक केली. संशयितांनी पोलिस कोठडीत दिलेल्या माहितीनुसार तपासाधिकारी रोहन खंडागळे यांच्या पथकाने बाबूलाल रमेश करवरे (रा. मध्यप्रदेश), पलविंदरसिंग व शेरुसिंग (रा. दोघे पंजाब) यांना ताब्यात घेतले. अटकेतील सर्व संशयितांची पोलिस कोठडी संपून ते सध्या कारागृहात आहेत. याच टोळीतील "मास्टरमाइंड' दरोडेखोरांनी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-निजामपूर येथून नाफ्ता घेऊन जात असलेला टॅंकर मालासह लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. 

14-1 
भिवंडीतून तीस लाखांचा ट्रक पळवला 
जळगावच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या भामट्यांसह त्याच्यातीलच "टिम-बी'सोबत या दरोडेखोर टोळीने भिवंडी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 24 फेब्रुवारी 2017 ला दोन टन 300 किलो पेट्रोलियम इंधन (नाफ्ता) घेऊन जाणारा ट्रॉला (एमएच 48, जे 453) पळविल्याचे निष्पन्न झाल्यावरून भिवंडी येथील तालुका पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक चेतन पाटील आपल्या टिमसह जळगावात आले होते. गेले तीन दिवस त्यांनी संशयितांचा शोध घेत काहींना ताब्यात घेतले आहे. 

चौकट 
"मास्टरमाइंड' शेरु नांदेडला "वॉन्टेड' 
राज्य महामार्गावर चालत्या वाहनांची लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या व मास्टरमाइंड शेरुसिंग (रा. दोघे पंजाब) याच्याविरुद्ध नांदेड येथे अनेक लूटमारीचे व दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत असून त्याचा जळगाव व ठाणे पोलिस कसून शोध घेत आहेत
 

Web Title: marathi news jalgaon tankar