कर चुकविण्यासाठी कंपनीस आठ लाखांचा "चुना' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

जळगाव : खरेदीदाराने दीड कोटींचा माल खरेदी करताना संबंधित कंपनीला आवश्‍यक "सी' फॉर्म न भरून दिल्याने विक्री करणाऱ्या कंपनीस आठ लाखांचा भुर्दंड सोसावा लागला. "सी फॉर्म' न भरून देता खरेदीदाराने अशाप्रकारे संबंधित विक्री करणाऱ्या कंपनीची आठ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
विक्रीकरात सूट मिळवून देणारा हा फॉर्म जाणीवपूर्वक भरून देण्यात आला नाही, असे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली. या स्वरूपाचा हा जळगाव जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा मानला जात आहे. 

जळगाव शहरातील रिषभ मेटल्स ऍण्ड केमिकल्स कंपनीचे विधी सल्लागार जितेंद्र सुभाष वाणी (वय 40) यांनी यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार कंपनीने टेट्रोकेम या संस्थेशी व्यवहार होता. वर्ष 2014 ते 2017 दरम्यान टेट्रोकेम कंपनीने जळगावच्या रिषभ मेटल्स ऍण्ड केमिकल्स कंपनीकडून माल खरेदी केला. विक्रीकर नियमावलीनुसार माल विकताना 6 टक्के विक्रीकर आकारणे बंधनकारक आहे, अन्यथा खरेदीदार कंपनीने विक्रीकरचा "सी' फार्म दिल्यास त्यात 4 टक्के सूट देता येते. ट्रेट्रोकेम कंपनीने रिषभ मेटल या कंपनीकडून विश्‍वासावर 1 कोटी 40 लाख 54 हजार 334 रुपयांचा माल खरेदी केला. 

कंपनीस भुर्दंड आणि गुन्हा 
वेळोवेळी विनंती करूनही सी-फॉर्म आणि जास्तीचा करही अदा केला नाही. परिणामी, रिषभ मेटल्स कंपनीला 7 लाख 78 हजार 928 रुपयांचे भुर्दंड सोसावा लागला. याप्रकरणी कंपनीतर्फे पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून कंपनीच्या नूपुर पी. गुप्ता (गाझियाबाद, उ.प्र.), अनु कल्याण देव सेहगल (दहिसर,मुंबई), प्रमिर रवी जैन (जयपूर), राजेश सैगल (दहिसर), विनीत गुप्ता (गाझियाबाद. उ.प्र.) आणि नीरज गंजू यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दिली असून, सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विलास जैन यांच्या मार्गदर्शनात महेंद्र बागूल तपास करीत आहेत. 
 
Web Title: marathi news jalgaon tax 8 lakh froad compny