नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची आज निवडणूक

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची आज निवडणूक

जळगाव ः विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी उद्या (ता.25) मतदान होणार आहे. जिल्ह्यात या निवडणूकीसाठी 21 मतदान केंद्रे असतील. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली. मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य आज जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात मतदान यंत्रे कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली. 
उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी, तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, निवडणूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. 
निवडणूकीसाठी जळगाव तालुक्‍यात चार, चाळीसगाव, भुसावळ व अमळनेर तालुक्‍यात प्रत्येकी दोन तर धरणगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव या तालुक्‍यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान केंद्राचा समावेश आहे. 
 
बारा हजारांवर मतदार 
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 12056 इतके मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 9 हजार 363, महिला मतदार 2 हजार 693 आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 2380 मतदार जळगाव तालुक्‍यात असून त्यानंतर भुसावळ तालुक्‍यात 1 हजार 364, अमळनेर तालुक्‍यात 1 हजार 33 तर चाळीसगाव तालुक्‍यात 992 इतके मतदार आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com