ऑनलाइन बदल्यांबाबत मास्टर ट्रेनरची नेमणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

जळगाव : जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका ऑनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, शासनाकडून जळगाव ग्रुपच्या दोन कर्मचाऱ्यांना "मास्टर ट्रेनर' म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मास्टर ट्रेनरकडून जिल्ह्यातील पंचायत समिती कर्मचाऱ्यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भा. शि. अकलाडे यांनी दिली. 

जळगाव ग्रुप कर्मचाऱ्यांना आपली माहिती ऑनलाइन भरता यावी, यासाठी दीडशे कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. यात जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका ऑनलाइन करण्यासाठी रजिस्टेशन कसे करावे, तसेच माहिती कशी भरावी, माहिती भरताना येणाऱ्या अडचणी काय याबाबत ग्रुपमधील दोन्ही मास्टर ट्रेनर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. 
या ऑनलाइन प्रणालीत कर्मचाऱ्यांची बदली, रजा, सेवा कालावधी, कार्यमुक्तता, सेवानिवृत्ती व मूळ कागदपत्र आणि रहिवासी या सर्व बाबींची माहिती भरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सोडून इतर चौदा विभागातील वर्ग 3 व वर्ग 4 चे कर्मचाऱ्यांची सुरवातीला माहिती भरण्यात येणार असून, 30 जूनपर्यंत चार हजार कर्मचाऱ्यांची माहिती भरली जाणार असल्याची माहिती अकलाडे यांनी दिली तसेच पहिल्या दिवशी तीन कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका देखील भरण्यात आली आहे. यात सर्वांत जास्त कर्मचारी संख्या आरोग्य विभागाची असून 1 हजार 10 कर्मचाऱ्यांची माहिती आरोग्य विभागाला भरावयाची आहे. 
 
प्रशासनाची दमछाक 
शासकीय सेवेतील वर्ग एक व दोनच्या पदांची माहिती शासनस्तरावर भरली जात असून, वर्ग 3 व वर्ग 4 ची जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर भरली जात आहे. मात्र, यात शिक्षण विभागाचे कर्मचारी सध्या वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण आठ हजार शिक्षकांचा समावेश असून, इतक्‍या मोठ्या प्रमाणातील कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याचे आदेश आल्यावर सामान्य प्रशासन विभागाची दमछाक होणार आहे.

Web Title: marathi news jalgaon teacher online transfer