जळगाव जिल्ह्यात वैशाख वणवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

भुसावळ ः वैशाख महिन्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील तब्बल 13 शहरांचे तापमान 42 अंशसेल्सिअस पर्यंत पोचले. तुलनेने चाळीसगावचे तापमान सर्वांत कमी 38 अंश होते. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. अशी माहिती भुसावळच्या वेलनेस फाउंडेशनचे नीलेश गोरे यांनी ही माहिती दिली. 

भुसावळ ऍपमध्ये ऍक्‍युवेदरच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख शहरांच्या तापमानाची माहिती होते. जास्त तापमानासाठी अलीकडच्या काही वर्षात जिल्ह्याचे नाव घेतले जाते. यात भुसावळचे तापमान उन्हाळा लागताच किती असेल याची उत्सुकता सर्वांनाच असते. आज भुसावळ, जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, सावदा, वरणगाव, यावल या शहरांचे तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर बोदवड, भडगाव, पाचोरा या शहरांचे 40 तर अमळनेरचे 41 डिग्री सेल्सिअस तापमान होते. तुलनेने आज जिल्ह्यात सर्वांत कमी तापमान चाळीसगाव 38 डिग्री सेल्सिअस असल्याची नोंद केली आहे. 

Web Title: marathi news jalgaon temprature