जळगाव जिल्ह्यात तापमान पोहचले 41 अंशावर! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

जळगाव ः यंदाच्या उन्हाळ्याच्या सूर्याचा प्रकोप वाढता राहणार याचे संकेत आजच्या तापमानाने दिले असून, भुसावळ शहरातील तापमानाने चाळिशी ओलांडली. मार्च महिन्यात पहिल्यांदाच तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तर जळगावात शहराचा पारा 39 अंशावर पोचला असून, तीव्र झळा बसू लागल्या आहेत. दोन दिवसांपासून 38 अंशांवर असलेल्या तापमानात आज शहरात एका अंशाने वाढ झाली आज नोंदविले गेलेले तापमान यंदाचे उच्चांकी ठरले आहे. 

भुसावळ येथील वेलनेस फाउंडेशनचे संचालक व भुसावळ ऍपचे निर्माते नीलेश गोरे यांनी सांगितले, की काल शहराचे तापमान 39.5 डिग्री सेल्सिअस होते, ते 41 पर्यंत जाऊन पोचले. अर्थात या जास्त तापमानाचा कालावधी साधारणपणे अर्धा तासच होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातही तापमान 45 डिग्रीपर्यंत पोचण्याची शक्‍यता देखील वर्तविण्यात आली आहे. यंदा उन्हाळ्याची सुरवात झाल्यानंतर फैजपूर परिसरात मार्च महिन्याच्या सुरवातीपासून सरासरी 36 अंशावर तापमानाची नोंद झाली आहे. आज अचानक 36 अंशांवरून 39 अंशांवर तापमानाची नोंद येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या तापमान विभागाकडे झाली. 

दिवसा चटके अन्‌ रात्री गारवा 
जळगावातील तापमान हे साधारण मार्च महिन्याच्या सुरवातीलाच चाळिशीपर्यंत पोचत असते. परंतु, महिन्याच्या मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. आता आठवडाभरापासून दुपारच्या वेळी उष्णतेची लाट जाणवत आहे. रात्रीच्या वेळी मात्र गार वाऱ्यांमुळे फारशी उष्णता शहरात जाणवून येत नव्हती. दोन दिवसांपासून तापमानाचा पारा वर चढत असून, कमाल तापमानासोबत किमान तापमानातही वाढ होत आहे. ममुराबाद येथील हवामान विभागात 39 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद झाली. यामुळे दुपारी बारापासून उन्हाचे चटके तर जाणवत होतेच, पण दुपारच्या वेळी रस्त्यावरून जाताना उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. परंतू रात्रीच्यावेळी अजूनही गारठा जाणवत आहे. 

Web Title: marathi news jalgaon tempreture