तापमानात घसरण; चटके कायमच! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

जळगाव ः उष्णतेची लाट लागोपाठ पाचव्या दिवशीही कायम राहिली. गुरुवारच्या (23 मे) तुलनेत शहरातील पारा किंचित घसरल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली असली, तरी उन्हाचे चटके आणि उकाडा दिवसभर जाणवला. उष्णतेची लाट आणखी दोन-तीन दिवस राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत. 

उन्हाच्या तडाख्यामुळे जळगावकरांचे दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवतात. जसजसा सूर्य डोक्‍यावर येतो, तसतशी उन्हाची दाहकता अधिक तीव्र होत जाते. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याचे चित्र अनुभवण्यास मिळत आहे. यामुळे दुपारी बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाटही पाहावयास मिळत आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेता उन्हापासून सध्यातरी सुटका होणे शक्‍य नाही. 

पारा एक अंशाने घसरला 
या आठवड्यात गेल्या पाच-सहा दिवसांत तापमानात दोन अंशांची वाढ झाली होती. यामुळे उष्णतेची तीव्र लाट जळगावकरांना अनुभवण्यास मिळत होती. दोन-तीन दिवस पारा स्थिर राहिल्यानंतर आज कमाल तापमानात एका अंशाने घट होऊन पारा 42.8 अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. परंतु पारा खाली आला असला, तरी उन्हाचे तीव्र चटके आणि हवेत उकाडा कायम होता. यामुळे जळगावकर हैराण झाले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tempreture 42 degree