जिल्ह्यात दिवसाला पाचशे कुलर्सची विक्री 

live photo
live photo

जळगाव ः पंधरवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ होऊन जळगावचा पारा सातत्याने 42 अंशावर राहिला आहे. यामुळे आता उकाडा देखील जाणवू लागला आहे. दुपारी उष्णतेचे चटके बसू लागल्याने घरात बसणेदेखील कठीण झाले आहे. परिणामी पंखे, कूलरची मागणी वाढली आहे. या तापमानवाढीमुळे जिल्ह्यात दिवसाला किमान पाचशे ते सहाशे कुलर्सची विक्री होत आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे ही उलाढाल कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 
जिल्ह्यात दरवर्षीचे तापमान चाळीशीच्यावर राहत असल्याने कुलर, एअरकंडिशनची मागणी वाढत असते. तसेच आवश्‍यकतेप्रमाणे बनवून घेतलेल्या कुलरला अधिक मागणी होते. वजनाने जड, टिकाऊ असणाऱ्या 24 गेजच्या पत्र्याचे आवरण, पाणी टिकून ठेवणाऱ्या गवताच्या जाळ्या कुलरला लावलेल्या असतात. ग्राहकांच्या मागणीनुसार, खिडकी व खोलीत ठेवण्यासाठी दोन ते पाच फुटांपर्यंत कुलर बनवून दिले जातात. 

डेझर्ट कुलरमध्ये कोट्यवधींची उलाढाल 
डेझर्ट कुलर म्हणजे पत्री- लोखंडी कुलर बनवून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. जळगाव शहरात आठ ते दहा होलसेल व्यावसायिक या क्षेत्रात कार्यरत आहेत. या दहा होलसेल विक्रेत्यांकडून किमान वीस हजार कुलर दरवर्षी विक्रीला जातात. पत्र्याच्या जाडीनुसार कुलर बनवून देण्याची मजुरी ठरते. तर सध्या स्टेनलेस स्टीलच्या कुलरला पसंती दिली जात आहे. याशिवाय, इलेक्‍ट्रिकल्स दुकानदारांकडून देखील कुलर जातात. परंतु, सध्याचे वाढलेले तापमानामुळे पत्री आणि ब्रॅंडेड कंपनीचे कुलर मिळून सध्या स्थितीला दिवसाला पाचशे कुलरची विक्रीस जात आहेत. यामुळे केवळ कुलरची उलाढाल ही कोट्यवधींत होत आहे. 

एसी, फ्रिजची विक्रीही वाढली 
गोदरेज, सिंफनी यासह अन्य कंपन्यांनी तयार केलेले कुलर बाजारात विक्रीसाठी आहेत. यासह टॉवर एसी, विन्डो एसीदेखील उपलब्ध आहेत. एसीच्या किमती या त्याच्या क्षमतेनुसार पंधरा- वीस हजाराहून अधिक आहेत. सामान्यांना एसी घेणे परवडणारे नसले तरी देखील गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून एसीच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे फ्रिजचा खप देखील वाढला आहे. 
 
हजारो तरुणांना रोजगार 
साधारण मार्चपासून कुलर्स, एसी, फ्रिज विक्रीत तेजी येते. ब्रॅन्डेड कुलर्स विक्रीसह डेझर्ट कुलर बनविणे, त्यांची देखभाल-दुरुस्ती, मोठे कुलर्स भाड्याने देणे याचा धंदाही तेजीत असतो. मार्च ते जून असे चार महिने हा व्यवसाय चांगला चालतो. या माध्यमातून शहरासह जिल्ह्यात शेकडो तरुणांना रोजगारही मिळतो. जिल्ह्यात या उपकरणांच्या व्यवसायात या चार महिन्यांत जवळपास दोन हजार तरुणांसह व्यावसायिक काम करतात. 


- 10.................................... होलसेल कुलर विक्रेते. 
- 500.................................. कुलरची दिवसाला विक्री. 
- 2000................................ एका होलसेलरकडील विक्री (संपूर्ण सीझन). 
- 3000 ते 7500 हजार रुपये......डेझर्ट कूलरची किंमत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com