जळगावात उन्हाचा कहर... पारा 45 अंशांवर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

जळगाव ः जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाल्यानंतर दोन दिवसांपासून वाऱ्यांमुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली होती. मात्र, गुरुवारी जळगावात तापमानाने 45 अंशांपर्यंत मजल मारली. यंदाच्या मोसमातील हा उच्चांक असून, राज्यातही सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाल्याचे वृत्त आहे. 
दरम्यान, या वाढत्या तापमानामुळे जनजीवन पूर्णत: प्रभावित झाले असून उष्माघाताने गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी तीन-चार दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहील, असे सांगितले जात आहे. 

जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यंतरापासूनच तापमानात प्रचंड वाढ झाल्याने "मे हिट'चा तडाखा जाणवत आहे. यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारा 44 अंशावर पोचून वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली होती. वाढलेल्या तापमानामुळे जाणवणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतु, दोन दिवसांपासून हवेमुळे उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती. सोमवारी (ता.7) जळगावचे तापमान 44 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. मात्र यात एका अंशाने घसरण होऊन दोन दिवस तापमान 43 अंशावर स्थिर होते. 

आज पुन्हा वाढ 
जळगावचा पारा गेल्या महिनाभरापासून सतत चाळीशीच्यावर आहे. यातच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमान 44 अंशावर पोचले होते. हेच तापमान सोमवारपर्यंत कायम होते. मात्र, दोन दिवसांपासून पारा 43 अंशावर आले आहे. पण आज वारा कमी झाल्याने उन्हाची तीव्रता पुन्हा वाढली असून, गुरुवारी 44.6 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद झाली. आणखी दोन दिवस पारा स्थिर राहणार असून, यानंतर तापमानात घसरण होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 

उन्हाच्या झळा असह्य 
तापमानाची तीव्रता पुन्हा वाढल्याने सकाळी साडेदहापासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. दुपारी बारानंतर तर रस्त्यावरून जाताना उन्हाच्या झळा असह्य होत होत्या. यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील रहदारी आणि मार्केटमधील वर्दळ काहीशी कमी पाहण्यास मिळाली. सायंकाळी पाच- साडेपाचनंतर मार्केटमध्ये खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढत होती. 
 
संस्था आणि नोंदी 
स्कायमेट : 45 
वेलनेस वेदर : 46 
भारतीय हवामान खाते : 44.6 
शासकीय हवामान केंद्र : 44.6 
 
Web Title: marathi news jalgaon tempreture highest