सावधान : खानदेशात आठवडाभर उष्णतेची लाट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. 

गेल्या दीड महिन्यापासून खानदेशात वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. ओडिशातील "फनी' वादळामुळे गेल्या आठवड्यात तापमान घटले होते. मात्र या आठवड्यापासून तापमान वाढीस पुन्हा सुरवात झाली. हवामान खात्याने तर आगामी आठवडाभर उष्णतेची लाट राहील, अशी शक्‍यता वर्तवली आहे. 
खानदेशासह अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोचण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड, परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोचेल. उर्वरित मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 18 ते 21 मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे, उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon temrature khandesh weak