जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी आता वेळेचे बंधन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 एप्रिल 2020

संस्थाद्वारे करण्यात येणारे बाजार कोणत्याही प्रकारे रस्त्यावर अथवा गल्लोगल्ली जाऊन विक्री करणारे विक्रेते यांनी ता. 15 ते 30 रोजी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत आपले व्यवहार सुरळीत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. 

जळगाव: अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली अनेक नागरिक रस्त्यावर फिरुन गर्दी करीत आहे. तसेच अनेक ठिकाणी सोशल डिस्टंगन्सीचे नियम देखील पाळले जात नसल्याने अत्यावश्‍यक सेवेतील किरणा दुकाने, भाजीपाला, दुधविक्री केंद्र ही बुधवार ता. 15 रोजी पासून सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिक अनावश्‍यकरित्या रस्त्यांवर फिरुन गर्दी करताना दिसून येत आहे. तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व किराणा मालाची दुकाने (घाऊक व किरकोळ) सर्व दूध विक्री केंद्रे, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, रस्त्यावर हातगाडीवर विक्री करणारे फिरते विक्रेते, काही संस्थाद्वारे करण्यात येणारे बाजार कोणत्याही प्रकारे रस्त्यावर अथवा गल्लोगल्ली जाऊन विक्री करणारे विक्रेते यांनी ता. 15 ते 30 रोजी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत आपले व्यवहार सुरळीत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. 

होम डिलीव्हरी देखील याच वेळेत 
काही संस्थाचालकांसह दुकानदारांकडून ग्राहकांना घरपोच सुविधा दिल्या जात आहेत. आतापर्यंत त्यांना देखील वेळेचे बंधन नव्हते परंतू आता त्यांना देखील वेळ ठरवून देण्यात आली असून त्यांनी देखील सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत आपली होम डिलिव्हरीची सुविधा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. 

अन्यथा गुन्हा दाखल होणार 
प्रशासनाने दिलेल्या वेळेव्यतिरिक्त कोणताही व्यक्ती किंवा दुकानदार कोणत्याही प्रकारे विक्री करताना आढळून आल्यास आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Time constrained to buy essentials

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: