सुसाट टॅंकरच्या धडकेत दोन तरुण जखमी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

जळगाव : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर ईच्छा देवी ते अजिंठा चौका दरम्यान वखारी जवळील वळण रस्त्यावर सुसाट टॅंकरच्या मागील चाकात आल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. जखमींना नागरीकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून गंभीर जखमी तरुणाला कुटूंबीयांनी मुबंईच्या जे.जे.रुग्णालयात हलवले असुन पळून जाणारा टॅंकर जप्त करण्यात आला आहे. 

जळगाव शहरातील तांबापुरा येथील तरुण समीर शफी पिंजारी (वय-19), अब्दुल रशिद मुक्तार बागवान (वय-18) दोन्ही मित्र रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अंजिठा चौकातील हॉटेल मध्ये जेवणासाठी निघाले होते. ईच्छादेवीकडून अजिंठा चौकाकडे जात असतांना पन्नालाल वखारी जवळील वळणावर टॅंकर(जी.जे.16क्‍यु.1058)ने मागुन दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही तरुण खाली कोसळून टॅंकरचे मागील चाक अब्दुल रशिद बागवान याच्या उजव्या पयावरुन गेल्याने तो गंभीर जखमी झाला. तर समीर पिंजारी हा देखील जखमी झाला होता. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, तेथून अब्दुल रशिद बागवान याला खासगी रुग्णालयात व तेथून मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असुन टॅंकर चालक सुशील कुमार शर्मा याला अटक करुन टॅंकर ताब्यात घेण्यात आला आहे. 

Web Title: marathi news jalgaon tractor accident