धावत्या रेल्वेतुन पडून तरुणाचा मृत्यु; वयोवृद्ध पित्याचा एकमेव आधार हरपला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

एक वर्षापुर्वीच महेशच्या आईचे आजारपणात निधन झाल्याने कुटूंबात वडील अशोक कुमार आणि महेश असे दोघेच होते. वयोवृद्ध वडील मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करीत होते.

जळगाव : मध्यप्रदेशातील खंडवा सिंधी कॉलनीत वास्तव्याला असलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यु झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. मयत प्रवासी तरुणाची ओळख पटवून त्याच्या घरी संदेश दिल्यावर वृद्धपित्याचे अवसान गळाले होते. महेश अशोक कुमार गंगवाणी (वय-27) असे मयत तरुणाचे नाव असून आज दुपारी त्याच्यावर शवविच्छेदन करुन मृतदेह वडिलांना सोपवण्यात आला. 

क्‍लिक करा - सापडलेल्या एक लाख रूपयांच्या बॅगसोबतचा प्रवास...पांडूरंगाच्या दर्शनापेक्षाही दिले याला प्राधान्य 

महेश अशोक कुमार गंगवाणी(वय-27) हा तरुण जळगाव बाजारातून ठोक भावात भाजीपाला घेवून खंडव्यात विक्री करीत होता. एक वर्षापुर्वीच महेशच्या आईचे आजारपणात निधन झाल्याने कुटूंबात वडील अशोक कुमार आणि महेश असे दोघेच होते. वयोवृद्ध वडील मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करीत होते. महेशसाठी खंडव्यासहीत जळगावात स्थळ पाहण्याचे काम सुरु होते. काल तो, जळगावी कामानिमीत्त आला होता, सिंधी कॉलनीतील देवस्थानाचे दर्शन घेवून संध्याकाळी महेश सचखंड एक्‍सप्रेसने खंडवा जाण्यासाठी निघाला होता. जळगाव स्थानक सोडल्यानंतर गाडी भुसावळच्या दिशेने जात असतांना भादली जवळ धावत्या रेल्वेतून पडून महेशचा मृत्यु ओढवला. रेल्वे उपस्टेशन प्रबंधकांनी नशिराबाद पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. मृतदेहाची ओळख पटल्यावर त्याच्या वडीलांना घटनेची माहिती देण्यात आली. 

हेपण वाचा - वेश्‍या व्यवसायातून तिला बाहेर काढून लग्नाचा केला बनाव; पुन्हा लोटले त्या खाईत

पिताच झाला अनाथ 
अशोक कुमार गंगवाणी यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी मुलगा महेश याने सांभाळली होती. भाजीपाला विक्री करुन येणाऱ्या उत्पन्नातून दोघांचा उनिर्वाह सुरु होता. लवकरच महेशचे लग्न लावून दिल्यावर चिंतेतून मुक्त होवु या अपेक्षेने स्थळ संशोधन सुरु होते. मात्र, अवेळीच मुलाचा मृत्यु झाल्याने पिताच अनाथ झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon train Lying boy death and father Orphan