खासगी बस- ट्रक अपघातात तीन जणांचा मृत्यू 

खासगी बस- ट्रक अपघातात तीन जणांचा मृत्यू 

जळगाव ः भुसावळ- जळगाव दरम्यान असलेल्या साकेगाव पुलाजवळ मध्यरात्री खासगी बस आणि ट्रकच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 प्रवाशी जखमी आहेत. सदर घटना आज मध्यरात्री घडली असून जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 
प्रवाशी वाहतुक करणारी खासगी ट्रॅव्हल्स यवतमाळहून सुरतकडे जात होती. प्रवाशी घेवून जाणाऱ्या बसला भुसावळकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. यात ट्रॅव्हल्सचा समोरील भाग पुर्णपणे दाबला गेला आहे. ट्रकच्या जोरदार धडकेमुळे झोपलेल्या प्रवाशांना अचानक दणक्‍यात काय झाले? हे क्षणभर समजलेच नाही. या अपघातात ट्रॅव्हल्स्‌मधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, साधारण वीस ते पंचवीस प्रवाशी जखमी आहेत. मध्यरात्री अपघात घडल्याने जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात उशिर झाला. ट्रॅव्हल्स्‌मधील सर्व जखमी काही प्रवाशांना जवळील गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये तर काहींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com