झाडावर जाहिरात लावल्यास दोन हजारांचा होणार दंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

जळगाव ः शहरातील झाडांवर जाहिरातीचे फलक लावून झाडांचे विद्रुपीकरण, तसेच झाडांना खिळा, तार बांधून इजा करण्याचे प्रकार वाढत आहे. याबाबत आज महापालिकेत वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत सदस्यांनी झाडावर जाहिरात लावणाऱ्याला आता यापुढे दोन हजार रुपये दंड आकारणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे. 

जळगाव ः शहरातील झाडांवर जाहिरातीचे फलक लावून झाडांचे विद्रुपीकरण, तसेच झाडांना खिळा, तार बांधून इजा करण्याचे प्रकार वाढत आहे. याबाबत आज महापालिकेत वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत सदस्यांनी झाडावर जाहिरात लावणाऱ्याला आता यापुढे दोन हजार रुपये दंड आकारणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे. 
महापालिकेत वृक्ष प्राधिकरणाची आज बैठक घेण्यात आली. बैठकीच्या विषयपत्रिकेवर शहरातील विविध धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याचे प्रस्ताव तसेच विविध विषय मांडण्यात आले. यावेळी वृक्ष प्राधिकरण समितीमधील सदस्य सरिता नेरकर, नितीन बरडे, प्रशांत नाईक, प्रवीण कोल्हे प्रशासनाकडून उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, वृक्ष प्राधिकरण अधिकारी योगेश वाणी, प्रभाग अधिकारी भास्कर भोळे, सुभाष मराठे, व्ही. वो. सोनवणी उपस्थित होते. यावेळी धोकादायक 13 झाडे, 90 फांद्या तोडण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. 

..तर होणार कारवाई 
बैठकीत वृक्ष प्राधिकरण समितीकडून शहरात मोठ्या प्रमाणात झाडांचे जाहिरातीच्या फलकांनी विद्रुपीकरण होत असल्याचे तक्रार सदस्यांनी केल्या. यावर सर्वांनी निर्णय घेत यापुढे महाराष्ट्र विद्रुपी कलम अंतर्गत झाडांचे जाहिरात फलक लावून विद्रुपीकरण करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरले. तसेच महापालिकेच्या मालकीच्या इमारतीवरील उगवलेले झाडे तोडणे, खासगी इमारत अथवा घरावरील उगवलेले 
झाडे तोडण्यासाठी महापालिकेची परवानगी नागरिकांनी घ्यावी, असे निर्णय घेतले. 

"त्या' झाडांचा प्रस्ताव स्थगित 
वृक्ष प्राधिकरण समितीच्या विषयपत्रिकेवर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तोडलेली संरक्षकभिंतीलगतच्या 129 झाडांबाबत प्रस्ताव होता. सदस्यांनी याबाबत अधिकाऱ्यांचा यावर अहवाल नसल्याने हा प्रस्ताव स्थगित ठेवला. 
 
30 हजाराचा दंड वसूल 
यापूर्वीच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत परवानगी न घेता झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ठरले होते. त्यानुसार विनापरवानगी झाडे तोडलेल्या नागरिकांकडून 30 हजार रुपये वसूल केले असल्याची माहिती अभियंता श्री. वाणी यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tree advirtise 2 thousand penlti